प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ
By Admin | Updated: May 9, 2017 04:10 IST2017-05-09T04:10:01+5:302017-05-09T04:10:01+5:30
कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी परत एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित ‘पुणे बनेगा मंच’ हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम नुकताच झाला.

प्रतिभेला हक्काचे व्यासपीठ
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : कलाकारांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी परत एकदा कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित ‘पुणे बनेगा मंच’ हा नावीन्यपूर्ण कार्यक्रम नुकताच झाला.
प्रत्येक व्यक्तीच्या अंगी काही ना काही कला असते. फक्त त्या कलेला एक मंच हवा असतो आणि हा मंच देण्याचा प्रयत्न कलर्स प्रस्तुत लोकमत सखी मंच आयोजित या कार्यक्रमात करण्यात आला. या कार्यक्रमाचे वेगळेपण म्हणजे कुठल्याही परीक्षकाशिवाय ही स्पर्धा झाली. लाईव्ह व्होटिंगद्वारे विजेत्यांची निवड केली गेली. कन्यादान मंगल कार्यालय, हडपसर येथे झालेल्या या कार्यक्रमात अनेक स्पर्धकांनी आपल्या कलेचे प्रदर्शन केले. कार्यक्रमाच्या निवेदक मेघना झूजम या होत्या.
कलर्स चॅनलने आपल्या चोखंदळ प्रेक्षकांसाठी एका नावीन्यपूर्ण शोचे आयोजन केले होते. ‘इंडिया बनेगा मंच’ या नावातच याचे वेगळेपण दडले आहे. एका टॅलेंट शोला अशा पद्धतीने सादर करणे म्हणजे सर्व कलाकारांना आपल्या प्रतिभेला जनतेसमोर आणण्याचे प्रोत्साहन देणे होय.
हा कार्यक्रम कलर्स चॅनलवर ७ मेपासून प्रत्येक शनिवारी व
रविवारी रात्री ९ वाजता प्रक्षेपित होणार आहे.