शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

जगण्याच्या अधिकाराला अग्रक्रम हवा, बुलेट ट्रेनला नाही : पी. बी. सावंत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2019 19:55 IST

स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, अजून समाजातील अनेक घटकांना नीट जगता येईल अशी स्थिती नाही.

ठळक मुद्देमहाराष्ट्र बहुजन आघाडी राष्ट्रीय करण्याचा निर्धार

पुणे : स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे झाली, अजून समाजातील अनेक घटकांना नीट जगता येईल अशी स्थिती नाही. जगण्याचा हा मुलभूत अधिकार देण्याला प्रत्येक सरकारचा अग्रक्रम हवा बुलेट ट्रेनला नाही असे प्रतिपादन सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती  पी. बी. सावंत यांनी केले. महाराष्ट्र बहुजन आघाडी लवकरच राष्ट्रीय बहुजन आघाडी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बहुजन आघाडीचा निर्धार मेळावा सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिर येथे सोमवारी दुपारी झाला. उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील, मिलिंद पाखले, अलका जोशी तसेच अन्य अनेक स्वयंसेवी संस्था, संघटना यांचे प्रमुख पदाधिकारी मेळाव्याला उपस्थित होते. सावंत म्हणाले, राज्य घटनेत नवसमाज निर्मितीची कल्पना मांडली आहे. स्वातंत्र्य समता बंधुता यावर आधारीत असा समाज तयार करण्याचे ध्येय राज्यकर्त्यांसमोर होते, मात्र आपण सगळेच त्यांच्या तोंडाकडे पहात बसलो व त्यांनी काहीच केले नाही. आता महाराष्ट्र बहुजन आघाडी असा समाज निर्माण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आम्ही निवडणूका लढवू मात्र त्या सत्तेसाठी नाही, तर अशा समाजाच्या निर्मितीसाठीचकोळसे पाटील म्हणाले, काँग्रेस नको म्हणणाºयांना त्यांना चांगला पर्याय देणे जमले नाही. आता सत्तेवर आले आहेत, त्यांचे ध्येय समाजात फूट पाडण्याचे आहे. दलित, मुस्लिम, ख्रिश्चन हे या देशाचाच आहेत, पण ते त्यांना मान्य नाही. फूटीच्या विचारावरच त्यांची संघटना उभी आहे. त्यांचा प्रतिवाद करायला हवा. मोदी, शाह हे फक्त भारतासाठीच नाही तर जगासाठी धोकादायक आहेत व हे जगातील अनेक विचारवंतांनी सांगितले आहे. काँग्रेस कश्ीही असली तरी त्यांनी समाजासाठी काम केले, कायदे केले. ते सगळे कायदे मोडण्याच्या प्रयत्नात सध्याचे सरकार आहे. त्यांचा प्रतिवाद करायला हवा.मिलिंद पाखले यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला कायद्याच्या, घटनेच्या चौकटीत आणण्याची मागणी केली. वंचित विकास आघाडीचा फायदा भाजपाला झाला, त्यामुळेच आपण त्याआधीच त्यांचा राजीनामा दिला असे ते म्हणाले. अलका जोशी यांनी विद्यमान सरकारवर टीका केली. सामान्यांना मोडीत काढून विशिष्ट वगार्चा विचार करून काम सुरू आहे असे त्या म्हणाल्या. नागेश चौधरी, मौलाना साकीद, शरफुद्दीन अहमद, हर्षवर्धन कोल्हापुरे उपस्थित होते. विशाल कदम यांनी सूत्रसंचालन केले. 

टॅग्स :PuneपुणेBullet Trainबुलेट ट्रेनGovernmentसरकार