परवानगीचे अधिकार ‘एनईएन’ला द्यावे
By Admin | Updated: February 13, 2017 01:38 IST2017-02-13T01:38:20+5:302017-02-13T01:38:20+5:30
लोणावळा नगर परिषदेच्या परिक्षेत्रात मध्य रेल्वेचा नागरी भाग येत असल्याने या भागात नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविताना

परवानगीचे अधिकार ‘एनईएन’ला द्यावे
लोणावळा : लोणावळा नगर परिषदेच्या परिक्षेत्रात मध्य रेल्वेचा नागरी भाग येत असल्याने या भागात नागरिकांना मूलभूत सोयीसुविधा पुरविताना रेल्वे विभागाच्या परवानग्यांचा मोठा अडसर ठरतो. त्यामुळे परवानग्या देण्याचा अधिकार मुंबई कार्यालयाऐवजी लोणावळा येथील सहायक विभागीय अभियंता दर्जाच्या अधिकाऱ्याला (एईएन) देण्यात यावा, अशी मागणी लोणावळा नगर परिषदेच्या वतीने नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी मध्य रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक डी. के. शर्मा यांच्याकडे केली.
लोणावळा रेल्वे स्थानक आणि परिसराच्या तपासणीसाठी मध्ये रेल्वेचे मुख्य व्यवस्थापक डी. के. शर्मा या ठिकाणी आले होते. या वेळी त्यांच्या हस्ते स्थानकावर रेल्वे सुरू करण्यात आलेल्या नव्या तिकीट आरक्षण विभागाचे, रेल्वेच्या संबंधित फोटो गॅलरीचे, राजभाषा हिंदी केंद्राचे, तसेच महिलांसाठी नव्याने सुरू करण्यात आलेल्या प्रतीक्षालयाचे उद्घाटन करण्यात आले. नगर परिषदेच्या हद्दीतील नागरी भागात मूलभूत सोयीसुविधा देतात. (वार्ताहर)