वरंध घाटात दरड कोसळली

By Admin | Updated: July 21, 2014 04:02 IST2014-07-21T04:02:11+5:302014-07-21T04:02:11+5:30

भोर तालुक्यातील पर्यटकांना खुनावणाऱ्या वरंध घाटात सकाळी १० वाजता घाटातील वाघजाई देवीच्या मंदिरापासून २०० मी. अंतरावर महाडकडे जाताना मोठी दरड कोसळली.

The rift in the squares collapsed | वरंध घाटात दरड कोसळली

वरंध घाटात दरड कोसळली

नेरे : भोर तालुक्यातील पर्यटकांना खुनावणाऱ्या वरंध घाटात सकाळी १० वाजता घाटातील वाघजाई देवीच्या मंदिरापासून २०० मी. अंतरावर महाडकडे जाताना मोठी दरड कोसळली.
रविवारच्या सुटीमुळे पर्यटकांची फार मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. दरड कोसळल्यामुळे साधारणपणे तीन तास वाहतूक ठप्प झाली. एकेरी मार्ग वाहतुकीस सार्वजनिक बांधकाम उपविभाग भोर यांनी तत्काळ प्रयत्न करून मार्ग खुला करून दिला. या वेळी वाहनचालकांनी सहकार्य केले.
वरंध घाटात ५ ते ६ दिवस पावसाची संततधार चालू असल्यामुळे डोंगर ओले झालेले आहेत. त्यामुळे दरड कोसळलेली आहे. या नंतरही दरड कोसळण्याची दाट शक्यता आहे, असे शाखा अभियंता आर. पी. कोल्हे आणि पी. एम. जाधवर यांनी ‘लोकमत’ला माहिती देताना सांगितले. तरी वाहनचालकांनी घाटातून वाहने चालवताना सावधानता बाळगावी. घाटात जास्त वेळ वाहने उभी करू नयेत, असेही सांगण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: The rift in the squares collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.