भरधाव मोटारीने टेम्पोला दिली धडक

By Admin | Updated: August 22, 2016 16:45 IST2016-08-22T16:45:01+5:302016-08-22T16:45:01+5:30

चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव मोटारीची टेम्पोला धडक बसली. या अपघातात मोटारचालकासह पाच प्रवासी जखमी झाले.

Riding the car to Tempo | भरधाव मोटारीने टेम्पोला दिली धडक

भरधाव मोटारीने टेम्पोला दिली धडक

style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत 
 
पुणे, दि. २२ -  चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव मोटारीची टेम्पोला धडक बसली. या अपघातात मोटारचालकासह पाच प्रवासी जखमी झाले. रविवारी पहाटे साडेचारच्या सुमारास भोसले व्हिलेज गेटसमोर घडलेल्या या अपघातप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 
किरण प्रभाकर परब (वय 22, रा. वडारवाडी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. परब याच्यासह संदीप अशोक भाटकर (वय 22, रा. विश्वकर्मा सोसायटी, ससाणेनगर), विष्णू भगवान जाधव (वय 24, रा. आचल पार्क, पापडे वस्ती, फुरसुंगी), अक्षय धेंडे, आकाश होनमाने, कानिफनाथ प्रभाकर ससे (वय 23, रा. हडपसर) हे जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलीस हवालदार प्रविण नामदेव जगताप यांनी फिर्याद दिली आहे.
 
आरोपी परब अन्य प्रवाशांना घेऊन हडपसरकडून सासवडच्या दिशेने जात होता. मोटारीचा वेग जास्त असल्यामुळे त्याचे नियंत्रण सुटले. समोरुन येत असलेल्या टेम्पोला त्याच्या मोटारीची जोरात धडक बसली. सर्व जखमींवर उपचार सुरु आहेत. पुढील तपास उपनिरीक्षक माणिक डोके करीत आहेत. 
 

Web Title: Riding the car to Tempo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.