रिद्धिमाजी महाराज 'वीरांगना' पदवीने सन्मानित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:15 IST2021-02-26T04:15:21+5:302021-02-26T04:15:21+5:30
या वेळी रिद्धिमाजी महाराज यांना 'वीरांगना' पदवीने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी भंते पारसमुनीजी महाराज यांनी मंगल आशीर्वाद दिले. ...

रिद्धिमाजी महाराज 'वीरांगना' पदवीने सन्मानित
या वेळी रिद्धिमाजी महाराज यांना 'वीरांगना' पदवीने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी भंते पारसमुनीजी महाराज यांनी मंगल आशीर्वाद दिले. रिद्धिमाजी महाराज यांनी दीक्षादिनानिमित्त रमणिक मुनीजी महाराज यांचे अभिनंदन केले. अक्षयजी महाराज 'आखा', अमितज्योतिजी महाराज, हिमानीजी महाराज यांनी गुणगौरवाबद्दल उद्बोधन केले.
रमणिक मुनीजी महाराज यांची उत्तर भारताकडे विहार यात्रा सुरू होईल, असे सूचित करताना पाच वर्षांपूर्वी इंदोर येथील साधू परिषदेनंतर महाराष्ट्रात ज्या सर्व संघटनांनी कार्य केले होते, त्या सर्व संघटनांचे आभार मानले. या घटनेबद्दल पुण्याच्या सर्व संघटनांचे अध्यक्ष व अधिकारी यांनी अभिनंदन केले. बिबवेवाडी जैन श्रावक संघाच्या वतीने रमणिक मुनीजी आणि साध्वी रिद्धिमाजी महाराज यांचा शाल देऊन सत्कार केला. या प्रसंगी अहमदनगर येथील पाथर्डी परीक्षा मंडळ आयोजित प्रतिक्रमण स्पर्धेतील बक्षिसे वितरीत करण्यात आली.
बिबवेवाडी जैन श्रावक संघाचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संघाच्या वतीने पन्नालाल पितलिया, गणेश ओसवाल, प्रवीण चोरबेले, लालचंद कर्नावट, सुभाष बाफना, विजय समदाडिया, संपतलाल भटेवरा, अविनाश कोठारी, कीर्तिराज दुगड, सुनील बलाई, सविता कर्नावट, अलका कोठारी, मंगल खिवंसरा, नेहा ओसवाल, मंगल लुंकड आदींनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. माणिक दुगड यांनी आभार मानले. स्नेहल चोरडिया यांनी सूत्रसंचालन केले.