रिक्षा-टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळ स्थापन
By Admin | Updated: July 26, 2014 00:38 IST2014-07-26T00:38:05+5:302014-07-26T00:38:05+5:30
ऑटो रिक्षा व टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळ स्थापण्याचा निर्णय आज राज्यशासनाने घेतला.

रिक्षा-टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळ स्थापन
पुणो : ऑटो रिक्षा व टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळ स्थापण्याचा निर्णय आज राज्यशासनाने घेतला. यासाठी नेमलेल्या अभ्यास समितीचा अहवाल शिफारशींसह शासनाने स्वीकारत हा निर्णय घेतला. हे
मंडळ स्थापण्याचा अध्यादेश मंजुरीसाठी पुढील कॅबिनेट बैठकीत मांडण्यात येईल आणि त्यास मंजुरी देण्यात येईल, अशी माहिती कामगारमंत्री भास्कर जाधव यांनी दिली.
कल्याणकारी मंडळ स्थापण्या बाबत ऑटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीच्या सदस्यांबाबत कामगारमंत्र्यांची आज मंत्रलयात बैठक झाली. त्यात हा निर्णय घेण्यात आला. त्यास अभ्यास समितीचे सदस्य आमदार मोहन जोशी, परिवहन आयुक्त सहस्रबुद्धे, सहसचिव कोळसे पाटील, नितीन पवार, मदने, काकडे उपस्थित होते.
रिक्षा-टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळ तातडीने स्थापून कल्याणकारी योजना लागू कराव्यात; अन्यथा येत्या 15 ऑगस्टपासून राज्यव्यापी रिक्षा बंद पुकारण्यात येईल, असा इशारा ऑटो रिक्षाचालक-मालक संघटना संयुक्त कृती समितीने दिला होता. त्यामुळे तातडीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
राज्यसरकारने ऑक्टोबर 2क्13 मध्ये रिक्षा-टॅक्सीचालक कल्याणकारी मंडळासाठी अभ्यास समिती स्थापन केली होती. त्या समितीने कल्याणकारी मंडळाचा प्रारूप अहवाल शासनाला जानेवारी महिन्यात सादर केला आहे. मात्र, त्यावर
काहीच करण्यात आलेले नव्हते. त्यामुळे रिक्षा व टॅक्सीचालकांमध्ये
रोष होता.(प्रतिनिधी)
च्हे मंडळ अस्तित्वात आल्यानंतर
रिक्षाचालकांना पेन्शन, विमा, आरोग्य योजना, त्यांच्या मुलांना शिक्षणासाठी मदत इ. कल्याणकारी योजना लागू होतील. त्या माध्यमातून रिक्षाचालकांचे आर्थिक आणि सामाजिक जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे. त्यामुळे हा निर्णय चालकांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.