रिक्षाचालकांना आता सीपीआरचे प्रशिक्षण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:13 IST2021-09-11T04:13:32+5:302021-09-11T04:13:32+5:30
पुणे : पुण्यात आता येणाऱ्या काळात जवळपास पाच हजार रिक्षाचालकांना सीपीआर व प्रथमोपचारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. जागतिक प्रथमोपचार ...

रिक्षाचालकांना आता सीपीआरचे प्रशिक्षण
पुणे : पुण्यात आता येणाऱ्या काळात जवळपास पाच हजार रिक्षाचालकांना सीपीआर व प्रथमोपचारचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.
जागतिक प्रथमोपचार दिनानिमित्त 'बघतोय रिक्षावाला फोरम' व 'हृदय मेडिकल फाउंडेशन' यांच्या संयुक्त विद्यमाने जीवन रिक्षा हा उपक्रम राबविला जाणार आहे. या अंर्तगत रिक्षाचालकांना सीपीआरचे प्रशिक्षण दिले जाणार असल्याचे बघतोय रिक्षावाला फोरमचे संस्थापक अध्यक्ष डॉ. केशव क्षीरसागर यांनी सांगितले.
देशामध्ये रस्ते अपघातांत जे मृत्युमुखी पडतात. त्यातील ५० टक्के जखमींना वेळेत उपचार मिळाले तर त्यांचे प्राण वाचविण्यात यश येऊ शकते. रस्ते अपघातात अनेकदा रिक्षाचालक अपघातस्थळी लवकर पोहोचतो. त्यामुळे रिक्षाचालकांना सीपीआरचे प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. रिक्षाचालकांना प्रशिक्षण दिल्यानंतर शंभर रिक्षात ठेवण्यासाठी प्रथोमोपचार पेटी भेट दिली जाणार आहे.