शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

 पुण्यात रिक्षा व टेम्पो चालकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर असंतोष मोर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 20:22 IST

विविध फलक, चित्ररथाच्या माध्यमातून रिक्षा व टेम्पो चालकांच्या स्थितीची जाणीव...

ठळक मुद्देयोग्यता प्रमाणपत्रासाठी आळंदीत ट्रॅक

पुणे : नवीन वाहतूक कायदा व दंड महाराष्ट्रात लागू करू नये, खुला परवाना बंद करावा, टेम्पोला अधिकृत थांबे द्यावेत, ओला, उबेर बंद करावे अशा विविध मागण्यांसाठी मंगळवारी रिक्षा व टेम्पो चालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर असंतोष मोर्चा काढला. या मोर्चामध्ये विविध फलक, चित्ररथाच्या माध्यमातून रिक्षा व टेम्पो चालकांच्या स्थितीची जाणीव करून देण्यात आली. रिक्षा व टेम्पो पंचायतच्या वतीने मोर्चाचे आयोजन केले होते. भवानी पेठ येथील कार्यालय पासून मोर्चाला सुरूवात झाली. महात्मा गांधी यांच्या चित्रासह वाहन चालकांचे रोजचे मरण-पुण्याच्या वाहतुकीचे काय आहे. धोरण, पुण्यात वाहनांची संख्या किती वाहतूक धोरणाची काय आहे नीती, काल होती वाहतूक नियंत्रण शाखा-आज झाली वाहतूक महसूल शाखा असे फलक रिक्षा व टेम्पो चालकांनी हातात घेतले होते. तसेच या परिस्थितीमुळे रिक्षा टेम्पो चालक आत्महत्येच्या उंबरठ्यावर असल्याची जाणीव करून देणारा चित्ररथ मोर्चात होता. एका टेम्पोवर तीन आसनी रिक्षा ठेवून तिच्या दर्शनी भागात गळफास लटकावून त्यावर दोन्ही बाजूने  बळीराजानंतर आता आमचा नंबर लिहलेले फलक लावलेले होते. मोर्चाचे नेतृत्व नितीन पवार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आल्यानंतर डॉ. बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. यावेळी पवार यांच्यासह संपत सुकाळे, भरत गेडेवाड, गोरख मेंगडे, संतोष नांगरे, रवी पाटोळे,सुरेखा गाडे, आनंद बेलमकर आदी उपस्थित होते. पवार यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन दिले. यावेळी पुणे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदेही उपस्थित होते. प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून निवडणुका होताच खुल्या परवान्यासह इतर मागण्यांबाबत बैठक बोलविण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचे पवार यांनी सांगितले.--योग्यता प्रमाणपत्रासाठी आळंदीत ट्रॅकरिक्षा टेम्पो या सारख्या प्रवासी वा मालवाहतूक सेवा देणाऱ्या वाहनांना वार्षिक योग्यता प्रमाणपत्रासाठी दिवे येथील ट्रॅकवर जावे लागते. रिक्षा, टेम्पो सारख्या छोट्या वाहनांना ते अडचणीचे होत होते. पंचायतीच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आता आळंदी रस्त्यावरच २५० मीटरचा ट्रॅक निर्माण होत आहे. त्यामुळे रिक्षा टेम्पोसह वाहनधारकांना दिवे येथे जावे लागणार नाही, असे अजित शिंदे यांनी यावेळी स्पष्ट केल्याची माहिती नितीन पवार यांनी दिली.                                                                                                                               

टॅग्स :Puneपुणेauto rickshawऑटो रिक्षाRto officeआरटीओ ऑफीसTrafficवाहतूक कोंडी