पिंपरी : ट्रेडिंग ॲपच्या नावाखाली इन्व्हेस्टमेंटचे आमिष देत सुमारे १५ लाखांची फसवणूक करण्यात आली. ही घटना दत्तमंदिर रोड, वाकड येथे घडली. रिची आणि निनाद अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याबाबत वाकड येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय व्यक्तीने मंगळवारी (दि. १७) वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
ही घटना २९ एप्रिल ते २ मे २०२५ या कालावधीत घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २९ एप्रिल ते २ मे २०२५ दरम्यान, संशयितांनी व्हॉट्सॲपवरून फिर्यादीशी संपर्क साधून ट्रेडिंग ॲपमध्ये गुंतवणूक केल्यास दरमहा १० टक्के परतावा देण्याचे आमिष दाखवले.
फिर्यादी यांचा विश्वास संपादन करून १४ लाख ९३ हजार ५०० रुपये विविध बँक खात्यांत ट्रान्सफर करून घेत कोणताही परतावा न देता फसवणूक केली.