समिक्षा श्रॉफला दुहेरी मुकुट, विशाल साळवीला विजेतेपद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:16 IST2021-02-23T04:16:38+5:302021-02-23T04:16:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : रोहित शिंदे टेनिस अकादमी यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुरुष व ...

समिक्षा श्रॉफला दुहेरी मुकुट, विशाल साळवीला विजेतेपद
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : रोहित शिंदे टेनिस अकादमी यांच्या वतीने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुरुष व महिला टेनिस स्पर्धेत महिला गटात पुण्याच्या समिक्षा श्रॉफ हिने एकेरी व दुहेरी या दोन्ही गटांत विजेतेपद मिळवत दुहेरी मुकुट संपादन केला. पुरुष गटात एकेरीत विशाल साळवी याने विजेतेपद पटकावले.
स्वराज्यरक्षक संभाजी महाराज क्रीडा संकुल, कर्वेनगर येथील टेनिस कोर्ट येथे झालेल्या स्पर्धेत अंतिम फेरीत सहाव्या मानांकित समिक्षा श्रॉफ हिने इशिता जाधवचा टायब्रेकमध्ये ४-२, ४-३(७-३) असा पराभव करून एकेरीचे विजेतेपद पटकावले. दुहेरीत अंतिम फेरीत समिक्षा श्रॉफ हिने तन्वी तावडेच्या साथीत अश्वगंधा पराडे व सई जगताप यांचा ४-२, ४-२ असा पराभव करून या गटाचे विजेतेपद मिळवले. सोळा वर्षीय समिक्षा ही अकरावी इयत्तेत आरएमडी सिंहगड स्प्रिंगडेल शाळेत शिकत आहे. तिचे या वर्षातील दुसरे विजेतेपद आहे.
पुरुष गटात अंतिम फेरीत विशाल साळवी याने अंशुल सातवचा टायब्रेकमध्ये ४-३(७-३), ४-१ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपदाला गवसणी घातली. दुहेरीत अंतिम फेरीत जय दीक्षित व आरव साने या जोडीने सुजन परब व यश संत यांचा ४-१, ४-१ असा सहज पराभव करून विजेतेपद पटकावले. पारितोषिक वितरण उद्योजक अमोल वरखडे व केदार बराटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी स्पर्धा संचालक रोहित शिंदे, मुख्य प्रशिक्षक दत्तात्रय शिंदे, रोहन शिंदे, आदित्य टक्के, अंकुश कराळे, प्रमोद चौधरी आदी उपस्थित होते.
स्पर्धेचा सविस्तर निकाल : एकेरी गट : महिला गट : अंतिम फेरी :
समिक्षा श्रॉफ (६) वि.वि. इशिता जाधव ४-२, ४-३-(७-३);
पुरुष : उपांत्य फेरी :
अंशुल सातव वि.वि. ईशान देगमवार १-४, ४-०, ४-०;
विशाल साळवी वि.वि.साहिल तांबट ४-२, ४-२;
अंतिम फेरी: विशाल साळवी वि.वि.अंशुल सातव ४-३ (७-३), ४-१
दुहेरी गट : महिला : उपांत्य फेरी:
समिक्षा श्रॉफ/तन्वी तावडे वि.वि.श्रुती नांजकर/हृता सचदेवा ३-५, ४-१, १०-७;
अश्वगंधा पराडे/सई जगताप वि.वि. अंतरा मोहोळ/अवनी वानखेडे ४-१, ४-१;
अंतिम फेरी : समिक्षा श्रॉफ/तन्वी तावडे वि.वि.अश्वगंधा पराडे/सई जगताप ४-२, ४-२.
पुरुष गट: उपांत्य फेरी:
जय दीक्षित/आरव साने वि.वि.काहिर वारीक/सार्थ बनसोडे ६-५ (७-५), ६-१;
सुजन परब/यश संत वि.वि.व्यंकटेश आचार्य/नितीन सावंत ६-५ (७-४), ६-५ (७-३);
अंतिम फेरी : जय दीक्षित/आरव साने वि.वि. सृजन परब/यश संत ४-१, ४-१.