शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

तिकीट रद्दने रेल्वे मालामाल : वर्षभरात तब्बल ३२ कोटींचा महसूल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 18:49 IST

आरक्षित, तात्काळ, प्रतिक्षा यादीतील तिकीट प्रवाशांनी विविध कारणांमुळे रद्द केल्याने मध्य रेल्वे मालामाल होत आहे.

ठळक मुद्देआरक्षणाची स्थिती व तिकीट रद्दच्या कालावधीनुसार प्रति प्रवासी शुल्क आकारले चार महिने आधीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण करता येते.

पुणे : आरक्षित, तत्काळ, प्रतिक्षा यादीतील तिकीट प्रवाशांनी विविध कारणांमुळे रद्द केल्याने मध्य रेल्वे मालामाल होत आहे. रद्द तिकिटाच्या रकमेतून मागील वर्षभरात मध्य रेल्वेच्या पुणे विभागाला तब्बल ३२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. आर्थिक वर्ष २०१७-१८ च्या तुलनेत यामध्ये सुमारे तीन कोटी रुपयांची वाढ झाली आहे. देशातील लांबपल्ल्याच्या प्रवासासाठी प्रवाशांकडून रेल्वेला प्राधान्य दिले जाते. मागील काही वर्षांत प्रवाशांसाठी विविध सुविधा असलेल्या रेल्वेगाड्या मार्गावर आल्या आहे. तिकीट आरक्षणासह विविध सुविधा ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. त्यामुळे तिकीट खिडकीवरील गर्दी कमी झाली आहे. चार महिने आधीच रेल्वे गाड्यांचे आरक्षण करता येते. तसेच काही तास आधी तत्काळ तिकिटाचीही सुविधा आहे. पण अनेकदा काही कारणांमुळे आरक्षित तिकीट रद्द करावे लागते. त्यासाठी रेल्वेकडून प्रति प्रवासी शुल्क घेतले जाते. रेल्वेची प्रवासी संख्या वाढत चालल्याने तिकीट रद्द करणाऱ्या प्रवाशांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे.मागील वर्ष भरता प्रवाशांनी रद्द केलेल्या तिकिटाच्या माध्यमातून रेल्वेला शुल्करुपाने ३२ कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. याचा अर्थ दररोज सुमारे ९ लाख रुपये महसूल मिळत आहे. रेल्वेकडून आरक्षित, तात्काळ, प्रिमियम तत्काळ, अंशत: आरक्षित आणि प्रतिक्षा यादीतील तिकीट रद्द करता येते. वातानुकूलित (एसी) प्रथम श्रेणी/एक्झिक्युटिव्ह, एसी टू टायर प्रथम श्रेणी, एसी थ्री टायर चेअर कार, एसी थ्री एकॉनॉमी, शयनयान श्रेणी आणि द्वितीय श्रेणी यांसह आरक्षणाची स्थिती व तिकीट रद्दच्या कालावधीनुसार प्रति प्रवासी शुल्क आकारले जाते. अनेक प्रतिक्षा यादीतील प्रवाशांचे तिकीट आरक्षित होत नाही. त्यामुळे हे प्रवासी तिकीट रद्द करण्याचे प्रमाण अधिक आहे.  ---------आरक्षित तिकीट गाडी सुटण्याच्या वेळेच्या ४८ तास आधी रद्द केल्यास प्रथम श्रेणीसाठी २४० रुपये, टू टायरसाठी २००, थ्री टायरसाठी १८० आणि द्वितीय श्रेणीसाठी ६० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे. तर १२ तास आधी तिकीट रद्द केल्यास तिकीट दराच्या २५ टक्के आणि ४ तास आधी रद्द केल्यास ५० टक्के रक्कम शुल्क म्हणून घेतली जाते. गाडी सुटण्याच्या वेळेत किंवा चार तासांत तिकीट रद्द केल्यास तिकीटाचे पैसे परत मिळत नाहीत. त्याचप्रमाणे तात्काळ आणि प्रिमियम तात्काळ तिकीट रद्द केल्यासही पैसे परत केले जात नाहीत. प्रतिक्षा यादीतील तिकीट रद्द करण्यासाठी शुल्क आकारले जाते. गाडी सुटण्याच्या ३० मिनिटे आधी तिकीट रद्द केल्यास ६० रुपये शुल्क घेतले जाते. त्यानंतर मात्र पैसे परत मिळत नाहीत.

तिकीट रद्दमुळे मिळालेला महसुलवर्ष            महसुल२०१८-१९        ३२ कोटी२०१७-१८        २९ कोटी 

टॅग्स :PuneपुणेIndian Railwayभारतीय रेल्वेreservationआरक्षणpassengerप्रवासी