महसूल विभागाची इनामगावात कारवाई
By Admin | Updated: January 12, 2015 22:59 IST2015-01-12T22:59:01+5:302015-01-12T22:59:01+5:30
इनामगाव (ता. शिरूर) येथे बेकायदा वाळूउपसा करणा-या व वाळू वाहतूक करणा-या वाहनावर कडक कारवाई करण्यासाठी शिरूर महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी सरसावले.

महसूल विभागाची इनामगावात कारवाई
मांडवगण फराटा : इनामगाव (ता. शिरूर) येथे बेकायदा वाळूउपसा करणा-या व वाळू वाहतूक करणा-या वाहनावर कडक कारवाई करण्यासाठी शिरूर महसूल विभागाचे अधिकारी व कर्मचारी सरसावले. नायब तहसीलदार गीतांजली गरड-मुळीक म्हणाल्या, की वाळूचोरावर आमची करडी नजर असून, त्यांच्यावर अशीच कारवाई केली जाणार आहे. कोणत्याही वाळू माफियांची गय केली जाणार नाही. त्या ठिकाणी काहीही सापडत नाही. त्यामुळे अनेक वेळा मला ट्रक, मोटारसायकलचा वापर करून वाळूमाफियावर कारवाई केली आहे व या कारवाया अशाच यापुढेही करत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
‘लोकमत’ने ११ जानेवारी रोजी घोड नदीचा बेकायदेशीर वाळूउपसा सुरूच वृत्त प्रसिद्ध होताच इनामगाव येथे घोड नदीपात्रात वाळूवाहतूक करणारा ट्रक अडीच ब्रास वाळू भरलेला ट्रक क्रं -एम एच १४ बीएम १९२५ पकडून मांडवगण फराटा येथे पोलिसांच्या ताब्यात देण्यात
आला. मांडवगण फराटा पोलीस औटपोस्टचे जमादार संजय कोलते यांनी मालक कुमार झुपले (शेलारवाडी, तळेगाव दाभाडे) व चालक बापू वामन रांधवन (बिटकेवाडी, कर्जत) याच्यावर वाळू चोरीचे गुन्हे दाखल केले आहेत. शिरूर प्रशासनाने तहसीलदार रघुनाथ पोटे, नायब तहसीलदार गीतांजली गरड-मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली इनामगाव तलाठी गोविंद घोडके व मांडवगण फराटा येथील तलाठी अमोल कडेकर यांनी नदीपात्रात जाऊन वाळूमाफियांवर कारवाई करण्यासाठी गेले असता, त्यांना नदीपात्रातून हा ट्रक वरती येताना दिसला. परंतु नदीपात्रात जाण्याआगोदर नदीपात्रातून जेसीबी व ट्रॅक्टर आज गायब होते. (वार्ताहर)