पुणे : महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याकरिता स्थापन करण्यात येणारी ‘महसूल समिती’ येत्या 15 दिवसात कार्यान्वित होणार असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली. मंगळवारी झालेल्या बैठकीमध्ये महसूल वाढ व महसूल जमा करण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याच्या निर्णयाला मंजुरी देण्यात आली. या समितीमध्ये खातेप्रमुख दर्जाच्या अधिकाºयासह अनुभवी 15 सदस्यांचा समावेश असणार आहे. शहराचा परिघ दिवसेंदिवस वाढत चालला आहे. परंतू, त्या पटीत पालिकेला महसूलाची प्राप्ती होत नाही. महसूलामध्ये वाढ करण्याचे विविध प्रयत्न यापुर्वी करण्यात आले आहेत. परंतू, त्यातील अवघेच काही यशस्वी झाले आहेत. त्यामुळे महसुलात वाढ होण्यासाठी विशेष लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. त्या दृष्टीने विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या समितीसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करुन देण्यात येणार असून पालिकेच्या विविध विभागांमधील अनुभवी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. समितीच्या कामकाजासाठी 16 कर्मचारी आवश्यक आहेत. हा विभाग सुरु करण्यासाठी पालिका आयुक्त सौरभ राव यांच्यासोबत चर्चा झाली असून त्यांना यासंदर्भात पत्र दिल्याचे रासने यांनी सांगितले.======पालिकेच्या मुख्य उत्पन्नाची दारोमदार मिळकत करावर आहे. मिळकत कराची मोठी थकबाकी अद्याप वसुलीविना शिल्लक आहे. या थकबाकीच्या वसुलीसोबतच अन्य मार्गांद्वारे महसूलाची वाढ क रण्यासाठी या विभागाचे अधिकारी काम करणार आहेत. हे अधिकारी आणि कर्मचारी महापालिकेतीलच अन्य विभागातील आहेत. परंतु त्यांना केवळ उत्पन्न वाढीचेच काम करावे लागणार आहे. त्यादृष्टीने काय उपाययोजना करता येतील हे देखील या विभागाने पहायचे आहे, असे रासने यांनी नमूद केले.
पुणे महापालिकेच्या महसूल वाढीसाठी 'महसूल समिती’ होणार कार्यान्वित
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 21:13 IST
महसूलामध्ये वाढ करण्याचे विविध प्रयत्न
पुणे महापालिकेच्या महसूल वाढीसाठी 'महसूल समिती’ होणार कार्यान्वित
ठळक मुद्देपालिकेच्या मुख्य उत्पन्नाची दारोमदार मिळकत करावर मिळकत कराची मोठी थकबाकी अद्याप वसुलीविना शिल्लकया समितीसाठी स्वतंत्र कक्ष उपलब्ध करुन देण्यात येणार