शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

शेवाळवाडी येथे वाळूमाफियांना महसूलचा दणका, 20 ट्रक ताब्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2018 00:44 IST

मोठी कारवाई : २० ट्रक ताब्यात, ७० लाखांचा दंड होणार वसूल

लोणी काळभोर : हवेली तालुक्यातील महसूल पथकाने पुणे-सोलापूर रस्त्यावर शेवाळेवाडी येथे सोमवारी (१२ नोव्हेंबर) सकाळी अचानक धाड टाकून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कारवाई करून वीस वाळूचे ट्रक ताब्यात घेतले आहेत. वाळू वाहतूकदारांवर झालेल्या कारवाईमधून शास्तीची रक्कम मिळून सुमारे ७० लाख रुपयांचा महसुली दंड शासनाला जमा होणार असल्याची माहिती महसूल पथकातील अधिकाऱ्यांनी दिली.

अचानकपणे झालेल्या कारवाईमुळे संतापलेल्या वाळूमाफियांनी या वेळी मंडलाधिकारी व तलाठ्यांच्या अंगावर गाड्या घालण्याचा प्रयत्न केला. तसेच, वाळूमाफियांचा हस्तक अनोळखी तरुणांनी बेकायदेशीर गर्दी जमवून महसूल पथकास अरेरावी करीत, दडपशाहीने कारवाई करण्यास मज्जाव करण्याचा प्रयत्न केल्याने संख्येने कमी असलेल्या पथकाची केविलवाणी अवस्था झाली होती. मात्र, कोणत्याही दबावाला न जुमानता अवैध वाळू वाहतूकदारांवर कारवाई केली. दिवाळीची शासकीय सुट्टी व सातबारा संगणकीकरणाच्या कामात तलाठी, मंडलाधिकारी व्यस्त असल्याने राजरोसपणे पुणे-सोलापूर महामार्गावर अवैधपणे वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरूच होती. वरिष्ठ कार्यालयातील आदेशानुसार हवेलीतील महसूल पथकाने वाळूचे अवैध होलसेल मार्केट समजल्या जाणाºया शेवाळेवाडी येथील ठिकाणी कारवाई केल्याने अवैध वाळू वाहनांचे मालक-चालक व त्यांच्या सहकाºयांनी खूप मोठा जमाव जमवून महसूल पथकास वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, महसूल पथकाने कारवाई करत आपले कर्तव्य चोख बजावल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. हवेलीचे तहसीलदार सुनील कोळी, उरुळीकांचनचे मंडलाधिकारी दीपक चव्हाण, वाघोलीचे मंडलाधिकारी किशोर शिंगोटे, थेऊरचे मंडलाधिकारी चंद्रशेखर दगडे, तलाठी दिलीप पलांडे, योगीराज कनीचे, प्रदीप जवळकर व सर्व सजामधील कोतवाल या कारवाईमध्ये सहभागी झाले होते. पकडण्यात आलेल्या या प्रत्येक वाहनांमध्ये अंदाजे चार ते पाच ब्रास वाळू आढळून आली आहे, त्याबाबतचा रितसर पंचनामा करण्यत आला आहे. पुणे जिल्ह्यात कोठेही वाळूचे लिलाव झालेले नाहीत, त्याचप्रमाणे इतरही जिल्ह्यांतून चोरट्या मार्गाने वाळू पुणे शहराकडे मोठ्या प्रमाणात येत असल्याचे स्पष्ट दिसत आहे.२० वाळूच्या वाहनांमधील दोन वाळूची वाहने पळून गेलेली आहेत. याबाबत, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करीत आहोत. पकडलेली वाहने हवेली प्रांत कार्यालयाच्या आवारात जमा करण्याचे काम सुरू आहे. वाहनचालक वाहनांच्या चावीसह पळून गेल्याने संबंधित वाहने ताब्यात घेण्यास अडथळे येत आहेत. मात्र, वरिष्ठांच्या आदेशानुसार कारवाई सुरूच राहणार आहे.- चंद्रशेखर दगडे, मंडलाधिकारी, थेऊर 

टॅग्स :Puneपुणेsandवाळू