शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोलचोरीतून खुनाचा गुन्हा उघड; तिघांना अटक करत फरासखाना पोलिसांनी केल्या ६ दुचाकी हस्तगत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2018 15:39 IST

बुधवार पेठेत पार्क केलेल्या गाडीतून पेट्रोल काढत असलेल्यांना गस्तीवरील पोलिसांनी पकडले़ त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत चाकण येथील डिसेंबरमधून खुनाचा गुन्हा उघडकीस आला.

ठळक मुद्देअटक केलेल्या तिघांकडून पोलिसांनी ६ दुचाकी व मोबाईल फोन केला हस्तगत आरोपींचे पूर्वीचे कोणतेही रेकॉर्ड नाही़ त्याबाबत तपास सुरु : बसवराज तेली

पुणे : बुधवार पेठेत पार्क केलेल्या गाडीतून पेट्रोल काढत असलेल्यांना गस्तीवरील पोलिसांनी पकडले़ त्यांच्याकडे केलेल्या चौकशीत चाकण येथील डिसेंबरमधून खुनाचा गुन्हा उघडकीस आला़ अटक केलेल्या तिघांकडून पोलिसांनी ६ दुचाकी व मोबाईल फोन हस्तगत केला आहे़ शिवशंकर बाळासाहेब मोरे (वय १९, रा़ मु पो़ खराबवाडी, चाकण, ता़ खेड), नवनाथ शांताराम बच्चे (वय २०, रा़ साई रेसिडेन्सी, चाकण) आणि किरण कैलास बंदावणे (वय २२, रा़ बंदावणे शिवार, मु पो़ कडुस, ता़ खेड) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत़ याबाबतची माहिती पोलीस उपायुक्त बसवराज तेली यांनी दिली़ फरासखाना पोलीस ठाण्यातील तपास पथकातील हवालदार बापुसाहेब खुटवड व पोलीस कॉन्स्टेबल अमेय रसाळ हे रात्र गस्तीवर असताना बुधवार पेठ भागातील रहिवाशांच्या पार्क केलेल्या गाडीतून पेट्रोल काढत असताना शिवशंकर मोरे याला पकडले़ त्याच्या मदतीने त्याचे दोन साथीदार नवनाथ बच्चे आणि किरण बंदावणे पकडण्यात आले़ त्यांच्याकडील मोटारसायकल ही कसबा पेठेतून १० जानेवारीला चोरीला गेल्याचे आढळून आले़ अधिक चौकशी केल्यावर त्यांनी ६ दुचाकी चोरल्याचे उघडकीस आले़ त्या खडक, शिवाजीनगर, विश्रामबाग, खडकी या पोलीस ठाण्यात चोरीचे गुन्हे दाखल आहेत़ दोन गाड्यांंच्या मालकांचा शोध सुरु आहे़ या संबंधी तिघांकडे वेगवेगळ्या पद्धतीने चौकशी करीत असताना त्यांनी पंधरा ते वीस दिवसांपूर्वी रात्रीचे वेळी चाकण एमआयडीसी मध्ये ए़ आऱ ए़ आय कंपनी ते सारासिटी रोडवर कंपनीतून सुटलेल्या एकाला रस्त्यात आडवून त्याचे खिसे तपासत असताना प्रतिकार केल्याने त्याला खाली पाडून त्याचे तोंडावर मोठे दगड टाकून खुन केल्याची कबुली दिली़ याबाबत चाकण पोलिसांकडे चौकशी केली असता १९ डिसेंबर २०१७ रोजी तेथे खुनाचा गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली़ धनंजय साहेबराव चौधरी (वय ३६, रा़ संतनगर, मुळशी प्राधिकरण, ता़ हवेली) असे त्यांचे नाव होते़ चौधरी हे मुळचे अमरावती जिल्ह्यातील राहणारे असून त्यांच्या पश्चात पत्नी व दोन लहान मुले आहेत़ चाकण पोलिसांना रस्त्याच्या कडेला मृतदेह पडलेला आढळून आला होता़ ४ दिवसांनंतर त्यांची ओळख पटली होती़ हे तीनही आरोपी वेगवेगळ्या कंपनीत हेल्पर म्हणून काम करतात़ त्यांना दारूचे व्यसन असून पैशासाठी चाकण एम़ आय़ डी़ सी़ मधून रस्त्याने घरी जाणाऱ्या लोकांना अडवून त्यांच्याकडील मौल्यवान वस्तू व रक्कम जबरदस्तीने काढून घेत असल्याचे आरोपींनी सांगितले आहे़ या आरोपींचे पूर्वीचे कोणतेही रेकॉर्ड नाही़ त्याबाबत तपास सुरु असल्याचे उपायुक्त तेली यांनी सांगितले़ ही कामगिरी उपायुक्त बसवराज तेली, सहायक पोलीस आयुक्त किशोर नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण अंबुरे, राजेंद्र चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक महेंद्र जाधव, कर्मचारी बापूसाहेब खुटवड, अमेय रसाळ, संदीप पाटील, विनायक शिंदे, दिनेश भांदुर्गे, हर्षल शिंदे, इक्बाल शेख, योगेश जगताप, संजय गायकवाड, ज्ञानेश्वर देवकर, शंकर कुंभार, विकास बोºहाडे, अमोल सरडे, विशाल चौगुले, राजन शिंदे यांच्या पथकाने केली़ 

टॅग्स :faraskhana policeफरासखाना पोलीसPuneपुणे