इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने गस्ती घालत  मोक्यातील फरार आरोपीला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2017 01:45 AM2017-12-17T01:45:35+5:302017-12-17T01:46:28+5:30

इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने गस्ती घालत असताना संशय आल्याने दुचाकी रस्त्यात दोघा संशयित आरोपींची चौकशी केली असता त्यांनी पळ काढला

Indiranagar police station's Crime Investigation Team arrested the absconding accused | इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने गस्ती घालत  मोक्यातील फरार आरोपीला अटक

इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने गस्ती घालत  मोक्यातील फरार आरोपीला अटक

Next
ठळक मुद्देकट्टा व तीन राउंड हस्तगत एक किलोमीटर अंतर पाठलाग

इंदिरानगर : इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाने गस्ती घालत असताना संशय आल्याने दुचाकी रस्त्यात दोघा संशयित आरोपींची चौकशी केली असता त्यांनी पळ काढला त्यांचा पाठलाग करून त्यापकी एका श्रीरामपूर येथील मोक्यातील फरार आरोपीला अटक करून त्यांच्याकडून देशी बनावटीचा कट्टा व तीन राउंड हस्तगत केले
इंदिरानगर पोलीस ठाण्याचे गुन्हे शोध पथकाचे उपनिरीक्षक रोहित शिंदे पोलीस हवालदार पाळदे शेख व बिर्शले हे वाहनातून माउलीनगर ते वासनगर या भागात गस्ती करीत असताना सुमारे साडेसात वाजेच सुमारास वासननगरजवळ दुचाकीवर दोन इसम दिसले त्यांचा संशय आला म्हणून त्यांची चौकशी करण्यासाठी जवळ जात असताना सदर इसम दुचाकीवरून भरधाव वेगाने पाथर्डीकडे पळाले. पथकाने सुमारे एक किलोमीटर अंतर त्यांचा पाठलाग करत असताना एक जण पडल्याने पोलिसांनी त्याच्यावर झडप टाकून त्यास पकडले. त्याची चौकशी केली असता त्याचे नाव अंकुश रमेश जेधे राणा, श्रीरामपूर असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता कमरेला एक देशी बनावटीचा कट्टा मॅगझिन लोड असे मिळाले तसेच बजाज डॉमिनर कंपनीची मोटारसायकल हस्तगत करण्यात आली, परंतु यावेळी मोटारसायकलचा मालक नईम सय्यद हे दोघे आरोपी श्रीरामपूर येथील मोका अंतर्गत गुन्'ांमध्ये सुमारे दोन वर्षांपासून फरार असल्याचे निदर्शनात आले. दोघे मोकाअंतर्गत असलेले आरोपी नाशिक शहरात कोणत्या कामासाठी व कोणाकडे आश्रयास होते याचा तपास सुरू आहे.

Web Title: Indiranagar police station's Crime Investigation Team arrested the absconding accused

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस