शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

प्रकल्प पूर्ण करून ठेवीदारांचे पैसे परत देतो; मला वृद्धाश्रमात ठेवा - डीएसके

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 01:05 IST

हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करून दोन वर्षांमध्ये ठेवीदारांचे पैसे परत करून काही रक्कम शिल्लक राहील, अशी माहिती बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी सोमवारी सुनावणीदरम्यान न्यायालयात दिली.

पुणे : हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करून दोन वर्षांमध्ये ठेवीदारांचे पैसे परत करून काही रक्कम शिल्लक राहील, अशी माहिती बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी यांनी सोमवारी सुनावणीदरम्यान न्यायालयात दिली. तसेच मला वृद्धाश्रमामध्ये ठेवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.गुंतवणूकदारांचे पैसे परत न करून फसवणूक केल्याप्रकरणी विशेष न्यायाधीश दिलीप मुरूमकर यांच्या न्यायालयात डीएसकेंविरोधातील खटल्याची सुनावणी सुरू आहे. २०१४पासून २०१७ पर्यंत जी व्यक्ती प्रकल्प पूर्ण करू शकली नाही, ती व्यक्ती दोन वर्षात प्रकल्प कसेपूर्ण करणार, असा सवाल विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी उपस्थित केला. तसेच डीएसके न्यायालयाची दिशाभूल करत असल्याचे सांगितले.डीएसके यांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून, त्यातील विक्री योग्य असलेल्या मालमत्तांची यादी न्यायालयात दिली आहे. या प्रकरणी सोमवारी झालेल्या सुनावणी दरम्यान डीएसके यांना न्यायालयात हजर केले होते. त्यावेळी डीएसके यांनी न्यायालयाकडे बोलण्याबाबत संधी मागितली. ठेवीदारांचे ५०१ कोटी रुपये सहज देता येऊ शकतात. म्हाडासोबत अनेक प्रोजेक्ट पूर्ण करण्यात आलेले आहेत, असे डीएसके यांनी न्यायालयाला सांगितले. त्याला अ‍ॅड. चव्हाण यांनी विरोध केला. आजच्या तारखेला ठेवीदारांचे १ हजार २८६ कोटी इतके देणे आहे. १ हजार ६५० कोटी रुपये बँकांचे देणे आहे. तर, १३५ कोटी रुपये एमसीडीचे देणे आहे. मग प्रकल्प पूर्ण करण्यासाठी डीएसके कोठून पैसे आणणार, असा प्रश्न अ‍ॅड. चव्हाण यांनी उपस्थित केला.

टॅग्स :D.S.Kulkarniडी.एस.कुलकर्णीPuneपुणे