सापडलेले पैसे केले परत

By Admin | Updated: July 11, 2015 05:07 IST2015-07-11T05:07:00+5:302015-07-11T05:07:00+5:30

: विमाननगरमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचे खिशातून पडलेले पैसे दोन व्यक्तींनी विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांकडे आणून दिले.

The returned money has been made | सापडलेले पैसे केले परत

सापडलेले पैसे केले परत

चंदननगर : विमाननगरमध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या तरुणाचे खिशातून पडलेले पैसे दोन व्यक्तींनी विमानतळ पोलीस ठाण्यामध्ये पोलिसांकडे आणून दिले.लोणीकंदमध्ये राहणारे विलास कंद व वडगावशेरीचे अनिल चांधेरे हे दोघे मोटारीमध्ये बुधवारी (दि. ८) दुपारी बारा ते एकच्या दरम्यान विमाननगरमधील श्रीकृष्ण चौकापासून सिम्बायोसिसच्या दिशेने जाताना त्यांच्यासमोरून जाणाऱ्या दुचाकीवरील तरुणाच्या खिशातून ३६ हजार रुपये रस्त्यावर पडले. याच वेळी कंद व चांधेरे यांनी ते पाहिले व त्या तरुणाला विमाननगरमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला; परंतु तो सापडला नाही. त्यानंतर कंद व चांधेरे यांनी ही रक्कम विमानतळ पोलीस ठाण्याचे संजय कुरुंदकर, राजेंद्र वाघ, संतोष जगताप यांच्याकडे फिर्याद देऊन दिले. याबद्दल विलास कंद व अनिल चांधेरे यांचा सन्मान करण्यात आला. (वार्ताहर)

Web Title: The returned money has been made

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.