अदलाबदल झालेली दुचाकी मालकाला परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2019 01:36 IST2019-03-01T01:36:51+5:302019-03-01T01:36:53+5:30

नजरचुकीने झालेला प्रकार

Return to the switched bicycle owner | अदलाबदल झालेली दुचाकी मालकाला परत

अदलाबदल झालेली दुचाकी मालकाला परत

पुणे : सारख्याच कंपनीच्या दोन्ही मोटारसायकल शेजारी पार्क केल्याने त्यातून वाहनचालकांचा गोंधळ होऊन नजरचुकीने चावी दुसऱ्याच मोटारसायकलला लागल्याने त्यातून वाहन अदलाबदलीची घटना घडली. मात्र, पोलीस प्रशासनाने तातडीने तपास करून मूळ मालकाला त्यांची मोटारसायकल परत केली.


२४ फेब्रुवारी रोजी विवेक पवार (रा. सर्वे नं ५/१/बी नवले ब्रीजजवळ, आंबेगाव बु. यांनी कर्वेनगर येथील रेड्डी हॉटेलजवळून आपली पार्क केलेली मोटारसायकल चोरीला गेली आहे अशी तक्रार अलंकार पोलीस चौकीत घेऊन आले.


त्यानंतर पीएसआय शिनगारे, पोलीस हवालदार जाधव व पोलीस शिपाई सुतार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तिथे सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपासणी केली असता त्यांना त्या ठिकाणी सारख्याच कंपनीची दुसरी मोटारसायकल आढळली.


नीलेश जैन (रा. कात्रज) असे त्या मोटारमालकाचे नाव असून त्यांच्याकडून नजरचुकीने त्या वाहनाला चावी लागल्याने ते घेऊन गेले.
मात्र पुढे पोलिसांनी तपास केल्यानंतर मूळ मालकाला त्याची मोटारसायकल परत करण्यात आली. त्याने आपली याबाबत कुठलीही तक्रार नसून पोलिसांचे आभार मानले.

Web Title: Return to the switched bicycle owner