शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
2
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
3
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
4
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
5
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
6
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
7
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
8
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
9
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
10
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
11
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
12
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
13
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
14
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
15
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
16
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
17
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
18
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
19
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
20
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!

'आंदोलकांवरील खोटे गुन्हे मागे घ्या'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 01:20 IST

मराठा समाजाला घटनात्मकदृष्ट्या वैध आरक्षण तत्काळ द्यावे, राजर्षी शाहूमहाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना क्षमतेने कार्यान्वित करावी.

पुणे : मराठा समाजाला घटनात्मकदृष्ट्या वैध आरक्षण तत्काळ द्यावे, राजर्षी शाहूमहाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना क्षमतेने कार्यान्वित करावी, प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहासाठी जागा द्यावी, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेच्या अडचणी दूर कराव्यात. तसेच पुण्यासह राज्यात मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेली खोटे गुन्हे मागे घ्यावेत, आदी प्रमुख मागण्यांचे निवेदन मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने गुरुवारी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना देण्यात आले.महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण दिले यावे, या मागणीसह विविध मागण्यांसाठी गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ ते १ या वेळेत ठिय्या आंदोलन केल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी जिल्हाधिकाऱ्यांना विविध मागण्यांचे निवेदन दिले.या वेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राजेंद्र कोंढरे, शांताराम कुंजीर, प्रवीण गायकवाड, विकास पासलकर, बाळासाहेब आमराळे, विकास भरगुडे, अ‍ॅड. कमल सावंत, विनायक ढेरे तसेच महिला प्रतिनिधी म्हणून सुप्रिया डाळिंबकर, नीता भोसले, रेखा कोंडे, मीना जाधव, दीपाली पाडळे, श्रद्धा काशीद, अमृत पठारे आदी उपस्थित होते.राजेंद्र कोंढरे म्हणाले, मराठा आरक्षणाबाबत राज्य मागासवर्गीय आयोगाकडे आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली असून ती कागदपत्रे तपासून आयोगाने तातडीने शासनाकडे अहवाल सादर करावा. तसेच मराठा समाजाला घटनात्मक वैध असे आरक्षण मिळण्यासाठी सर्व बाजूने आवश्यक ती कार्यवाही पूर्ण करावी. आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आरक्षण सोडून उर्वरीत सर्व सवलती मराठा विद्यार्थ्यांना तत्काळ द्याव्यात. राजर्षी शाहूमहाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करावी, डॉ. पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजनेअंतर्गत शहरी भागात शिक्षणासाठी आलेल्या आर्थिकदृष्ट्या मागास मराठा विद्यार्थ्यांना दरमहा मासिक भत्ता द्यावा.राज्य शासनाने जाहीर केल्याप्रमाणे जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांसाठी ५०० मुलांचे वसतिगृह निर्माण करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र,त्याची गती वाढविण्यात यावी.त्याचप्रमाणे जिल्हा परिषद व स्थानिक महापालिकांना असे वसतिगृह बांधण्याबाबत निर्देश देण्यात यावेत, असे नमूद करून कोंढरे म्हणाले, राज्यात बेरोजगार तरुणांची संख्या मोठी आहे. त्यामुळे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या कर्ज योजनेच्या अडचणी दूर कराव्यात. राज्यातील राष्ट्रीयकृत व सहकारी बँका यांचा पुरेसा सहभाग या योजनेत नाही. अपुरी कागदपत्रे, योजनेचा अपुरा व नकारात्मक झालेला प्रचार यामुळे कर्ज योजनेची प्रकरणे होत नाहीत. त्यामुळे याबाबत जागृती करून बँकांना कर्ज देण्याबाबत आदेश द्यावेत.>मोर्चाच्या प्रमुख मागण्याअनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंध अधिनियमाच्या तरतुदींचा होणारा गैरवापर थांबवावा, शेतकºयांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरसकट कर्जमाफी द्यावी. तसेच स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार शेतीमालाला हमी भावा द्यावा. त्याचप्रमाणे मराठा, इतर मागास, खुल्या प्रवर्गातील सरकारी अधिकारी कर्मचारी यांच्यावर पदोन्नतीत होणारा अन्याय थांबवावा, मराठ्यांच्या इतिहासाचे विकृतीकरण व मराठा समाजाची आणि सर्व महामानवांची बदनामी थांबवावी आदी मागण्यांचे निवेदनही देण्यात आले.>अधिकाºयांना प्रशिक्षण द्यावेमराठा समाजातील एक भाग असलेल्याकुणबी-मराठा, मराठा-कुणबी व कुणबीयांना आरक्षण असून या घटकांनाजातप्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया सुटसुटीत करण्यासाठी संबंधित अधिकाºयांना आवश्यक प्रशिक्षण द्यावे.तसेच सारथी संस्थेचे केंद्र सुरू करून या संस्थेच्या कामाला गती द्यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली.

टॅग्स :marathaमराठाMaratha Reservationमराठा आरक्षण