जुन्नरमधील सेवानिवृत्त शिक्षक प्रदीप वाईकर व त्यांचा मुलगा नरेन व सागर यांच्या संकल्पनेतून या कुटुंबाने हा उपक्रम राबविण्याचे नियोजन केले. वाईकर यांनी गरजू रुग्णांना जेवणाच्या डब्यासाठी संपर्क करा, असे आवाहन केले होते. वाईकर यांना या उपक्रमासाठी त्यांच्या कुटुंबीयांची मोठी मदत होत आहे. डबे देण्याने पुरुष मंडळी करतात तर रत्नमाला वाईकर, रोहिणी वाईकर या स्वयंपाक करतात. भाजी, डाळभात चपाती याचबरोबर पौष्टिक आहाराचादेखील यात समावेश आहे. वाईकर यांच्या मोफत जेवणाच्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
१३ जुन्नर
गरजू रुग्णाला जेवणाचे पार्सल देताना नरेन वाईकर.