शहरं
Join us  
Trending Stories
1
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
2
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
3
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
4
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
5
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

आजाराला कंटाळून सेवानिवृत्त अधिकाऱ्याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 3:08 AM

सिंहगड रस्त्यावरील घटना; आयुष्यभर देशसेवा आणि समाजसेवेचे केले काम

नऱ्हे : पार्किन्सनच्या आजाराला कंटाळून आणि इच्छामरणाला परवानगी नसल्याने वायू सेना अधिकाºयाने (निवृत्त) इमारतीवर जाऊन उडी मारून आत्महत्या केल्याची घटना तानाजी मालुसरे रस्त्यावरील (सिंहगड रस्ता) सरिता विहारमध्ये सोमवारी सायंकाळी सव्वाचार वाजता घडली.सुधाकर परांजपे असे त्यांचे नाव आहे. त्यांच्या मागे पत्नी, २ मुले आहेत. ते मूळ मुंबईमधील होते. १९६० साली वायुसेनेत दाखल झाले होते. १९६० ते १९८६ या २६ वर्षांच्या काळात वायुसेनेत त्यांनी उत्कृष्ट काम केल्याने त्यांना तत्कालीन राष्ट्रपती ग्यानी झैलसिंग यांच्या हस्ते अतिविशिष्ट सेवा पदकाने सन्मानितही करण्यात आले होते.१९८६ साली पुण्यात स्थायिक झाल्यानंतर त्यांनी दोन वर्षे पानशेतजवळ सोनापूरला रुग्णांची सेवा केली. त्यानंतरची दोन वर्षे त्यांनी दौंडजवळील केडगावलाही घरोघरी शौचालय बांधण्यासाठी खूप मेहनत घेतली. त्यानंतर पुण्यात त्यांनी असंख्य अपंग लोकांना मदत केली. दारूबंदी जनजागृतीसाठी त्यांनी विविध पथनाट्येही बसविली होती. पेन्शनचे पैसे ते समाजकार्यासाठी खर्च करीत होते. त्यांनी लिहिलेल्या मेक २१ क्रॅश विमान संबंधित ‘फ्लाईट डेटा रेकॉर्डर’ हे पुस्तक अजूनही वायुसेनेच्या मेक २१च्या ट्रेनिंगसाठी वापरले जाते.गच्चीवर फिरून येतो...‘तू भाजी कर, मी जरा गच्चीवर फिरून येतो असे पत्नीला सांगून त्यांनी आपल्या केअर टेकरला बोलावून माझी आता जायची वेळ आली आहे असे म्हणून त्यांनी पुढील दोन महिन्यांचे आगाऊ पैसे देऊ केले. त्याला घेऊन गच्चीवर गेलेले वायुसेनेचे सेवानिवृत्त ग्रुप कॅप्टन सुधाकर परांजपे यांनी त्याला सांगितले की, माझं पुस्तक आण, तो खाली गेलेला दिसताच त्यांनी घड्याळ, टोपी, चपला काढून गच्चीवरून उडी टाकून आत्महत्या केली.माझ्या बाबांनी आयुष्यभर देशसेवा व समाजसेवा केली मात्र त्यांना अशा पद्धतीने आत्महत्या करावी लागली याचं दु:ख होत आहे. सरकारने इच्छामरणासाठी काही निकष ठेवून परवानगी द्यायला हवी.- अजय परांजपे, थोरला मुलगा

टॅग्स :Suicideआत्महत्या