शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 15:41 IST

युपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून केंद्रीय लोकसेवा आयोगाने हा निकाल जाहीर केला आहे.

UPSC Exam 2024: यूपीएससी नागरी सेवा परीक्षा २०२४ चा निकाल जाहीर झाला आहे. यूपीएससीच्या निकालासोबतच टॉपर्सची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. यावेळी प्रयागराज येथील शक्ती दुबेने परीक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे तर हर्षिता गोयलने दुसरा क्रमांक पटकावला आहे. पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा आला आहे. त्यामुळे महाराष्ट्राची मान उंचावली आहे.

यूपीएससीने २०२४ च्या नागरी सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला आहे. प्रयागराजची शक्ती दुबे ही ऑल इंडिया टॉपर ठरली आहे. तर पुण्याचा अर्चित डोंगरे हा देशातून तिसरा आणि महाराष्ट्रातून पहिला आला आहे. एकूण १००९ उमेदवारांची नावे गुणवत्ता यादीत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्या पाचमध्ये आलेल्या तीन महिला उमेदवार आहेत. आयोगाकडून भारतीय प्रशासकीय सेवा, भारतीय परराष्ट्र सेवा, भारतीय पोलिस सेवा आणि विविध गट 'अ' आणि गट 'ब' या केंद्रीय सेवांमध्ये नियुक्त्यांसाठी एकूण १,००९ उमेदवारांची निवड करण्यात आली आहे.

नागरी सेवा परीक्षा २०२४ अंतर्गत, यूपीएससीने आयएएस, आयपीएससह सेवांमध्ये ११३२ पदांसाठी अर्ज मागवले होते. पूर्वी मूळ अधिसूचनेतही फक्त १०५६ रिक्त जागा होत्या पण नंतर त्या ११३२ पर्यंत वाढवण्यात आल्या. त्यानंतर निकालात एकूण १००९ उमेदवारांना यश मिळालं आहे.  त्यापैकी ३३५ उमेदवार सामान्य श्रेणीतील आहेत. १०९ जण ईडब्ल्यूएस, ३१८ ओबीसी, १६० एससी आणि ८७ एसटी प्रवर्गातील आहेत. निकाल जाहीर झाल्यानंतर सुमारे १५ दिवसांनी उमेदवारांचे गुण जाहीर केले जातील. १७ एप्रिल २०२५ पर्यंत युपीएससी परीक्षेच्या मुलाखती सुरु होत्या. मुख्य परीक्षेत यशस्वी झालेल्या सुमारे २८४५ उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावण्यात आले होते. त्यानंतर मंगळवारी निकाल जाहीर करण्यात आला.

पहिल्या दहा उमेदवारांची नावे

१. शक्ती दुबे

२. हर्षिता गोयल

३. अर्चित डोंगरे

४. मार्गी शहा

५. आकाश गर्ग

६. कोमल पुनिया

७. आयुषी बन्सल

८. राज कृष्ण झा

९. आदित्य विक्रम अग्रवाल

१०. मयंक त्रिपाठी

टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोगPuneपुणे