१४ वर्षे ३ महिने १८ दिवसांनी लागला निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:08 IST2021-07-23T04:08:50+5:302021-07-23T04:08:50+5:30

मोहोळ खून खटल्यात गुन्ह्यात १८ जणांवर दोषारोप दाखल करण्यात आले. सरकारी वकील उज्वला पवार यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली. ...

Results after 14 years 3 months and 18 days | १४ वर्षे ३ महिने १८ दिवसांनी लागला निकाल

१४ वर्षे ३ महिने १८ दिवसांनी लागला निकाल

मोहोळ खून खटल्यात गुन्ह्यात १८ जणांवर दोषारोप दाखल करण्यात आले. सरकारी वकील उज्वला पवार यांनी सरकारच्या वतीने बाजू मांडली. या खटल्यात ७६ साक्षीदार तपासण्यात आले. हा खटला निकालापर्यंत आला असताना यातील मुख्य सुत्रधार गणेश मारणे याच्याविरुद्ध फक्त १२० ब आरोप लावण्यात आला आहे. त्याच्यावर ३०२ चा आरोप ठेवण्यात आला नसल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्याच्यावरील आरोपात ३०२ कलमाचा समावेश करण्यात आला. त्याला अगदी सर्वेच्च न्यायालयापर्यंत आव्हान देण्यात आले. परंतु, ते फेटाळण्यात आला. त्यानंतर पुन्हा सर्व साक्षीदारांच्या साक्षी घेण्यात आल्या. दरम्यान, सर्व आरोपी साडेसात वर्षे कारागृहात होते. खटला लांबल्याने आरोपींना २०१४ मध्ये जामीन मंजूर करण्यात आला. असे ॲड. विपुल दुशिंग यांनी सांगितले.

चौकट

आरोपींनी मागितली खंडणी

मोहोळच्या खुनातील दोन आरोपींनी न्यायालयाच्या कामकाजासाठी एका दुकानदाराकडे दहा लाख रुपयांच्या खंडणीची मागणी केली होती. दुकानदाराला मारहाण करून पैसे न दिल्यास तुरुंगात राहून ‘तुझी गेम वाजवू’ अशी धमकीही देण्यात आली आहे. या प्रकरणी खडक पोलिसांनी अनिल वाघू खिलारे (वय ४६) व सागर वाघू खिलारे (४२, रा. शुक्रवार पेठ) यांना अटक केली होती.

चौकट

अपूर्ण न्याय

“आम्हाला सर्व आराेपींना शिक्षा होईल अशी अपेक्षा होती. मात्र, केवळ तिघा जणांना शिक्षा झाली. तब्बल १४ वर्षानंतरही न्याय मिळाला तरी तो अपूर्ण आहे असे वाटते,” असे संदीप मोहोळ यांची बहिण साधना मोहोळ यांनी सांगितले.

Web Title: Results after 14 years 3 months and 18 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.