शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिला पोलिसांसाठी सुसज्ज ‘विश्रांतीस्थळ ’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2018 20:24 IST

गणेशोत्सव, निवडणुका, आणिबाणी किंवा संकटसमयी पोलिसांना सलग दिवसांमध्ये काम करावे लागते. यात महिलांना अनेक प्रश्न भेडसावतात. 

ठळक मुद्देमहिला पोलिसांच्या आरोग्यावर ताणतणावाचा दुष्परिणाम

पुणे : गणेशोत्सव, निवडणुका, आणिबाणी किंवा संकटसमयी पोलिसांना सलग दिवसांमध्ये काम करावे लागते. अशावेळी त्यांना मानसिक व शारीरिक ताणतणावाला सामोरे जावे लागते. यात महिलांना अनेक प्रश्न भेडसावतात. यावर सक्षम पर्याय देण्याचा स्तुत्य उपक्रम रोटरी क्लब आॅफ पुणे एनआयबीएम या क्लबने केला आहे. त्यांनी महिला पोलिसांसाठी पुणे पोलीस आयुक्तालयात आधुनिक सुविधांनी युक्त विश्रांतीस्थळाचे काम पूर्ण केले आहे. या प्रकल्पाचे हस्तांतरण व उदघाटन पुण्याच्या पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्राज फाऊंडेशनच्या अध्यक्षा परिमल चौधरी, सहपोलीस आयुक्त रविंद्र कदम, पोलीस उपायुक्त शेषराव सुर्यवंशी, संतोष जोशी, अभय गाडगीळ, मनोज कार्येकर आणि रोटरीचे सभासद मोठया संख्येने उपस्थित होते. रोटरीने क्लबने महिला पोलिसांसाठी केलेल्या या प्रकल्पाचे कौतुक करताना शुक्ला म्हणाल्या, पुण्यात गणेशोत्सवासह इतरही काही उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात. या कालावधीत किंवा कधी कधी आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांना सातत्यपूर्वक ड्युटी करावी लागते. यावेळी महिला पोलिसांची कुचंबणा होते. यामुळे महिला पोलिसांच्या आरोग्यावर देखील याचा दुष्परिणाम होत असतो.  महिलांच्या बाबतीतला या प्रश्नावर निमित्तमात्र काही दिवस आवाज उठविला जातो. परंतु, कार्यवाही करण्यासाठी कुणीही पुढे येत नाही. रोटरी क्लबच्या माध्यमातून निर्माण करण्यात आलेले विश्रांतीस्थळ हे यासर्वांमध्ये प्रेरणादायी आणि तितकेच अनुकरणीय आहे. गणेशोत्सव,आणीबाणी  व संकट समयी दिवसभर काम करावे लागते. त्यांच्यावर मानसिक व अतिश्रमाने येणारा ताण हलका करण्यासाठी लोकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रकल्पात सहा बंक बेडस,अठरा लॉकर्स सुविधा, मोठा आरसा, दोन स्वच्छतागृहे, एक स्नानगृह, ड्रेसिंग टेबल, लिखाणासाठी टेबल, सहा खुर्च्या पुरवण्यात आल्या आहेत. परवीन प्रसाद यांनी सूत्रसंचालन केले तर स्वप्नीला माळवदे यांनी आभार मानले.

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसRotary Clubरोटरी क्लब