शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
5
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
6
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
7
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
8
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
9
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
10
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
11
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
12
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
13
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
14
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
15
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
16
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
17
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
18
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
19
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
20
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश

Chitra Wagh: वीज पुरवठा पूर्ववत करा अन्यथा सरकारला शॅाक बसल्याशिवाय राहणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2021 14:34 IST

जिल्हा परिषदेच्या ८०० शाळांमध्ये बिल न भरल्यामुळे वीज जोड तोडण्यात आले आहेत

पुणे : पुण्यात ज्ञानमंदिरात विद्यार्थ्यांच्या जीवनाचा पाया रचून त्यांचे भविष्य हे तेजोमय आणि उज्ज्वल केले जाते. अशा जिल्हा परिषदेच्या ८०० शाळांमध्ये बिल न भरल्यामुळे वीज जोड तोडण्यात आले आहेत. यामुळे या शाळा अंधारात आहेत. विद्येच्या माहेघरातच असं घडल्याने राजकीय पक्षांकडून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारवर टीका होऊ लागली आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी नितीन राऊत (Nitin Raut) यांच्याबरोबरच सरकारवर ट्विटरच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. 

''नितीन राऊतांनीवीज पुरवठा पूर्ववत करावा. अन्यथा सरकारला शॅाक बसल्याशिवाय राहणार नाही असा इशारा वाघ यांनी यावेळी दिला आहे.'' 

वाघ म्हणाल्या, पुणे जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या ८०० शाळांची वीज तोडली गेली. तर इतर शाळांचा वीजपुरवठा खंडीत करण्यात आला आहे.  कोट्यावधी खर्चून ‘लॅवीश’ घर बनवणा-या ऊर्जा मंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या आयुष्यात अंधार आणल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला आहे. तर ऊर्जामंत्रींचे घर रोषणाईच्या झगमगाटात आहे पण पुणे हे विद्येचे माहेरघर अंधारात असल्याचे त्या म्हणाल्या आहेत. 

महावितरणकडून बिल न भरल्यामुळे ८०० शाळांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे. त्याबाबत स्थायी समितीमध्ये सदस्यांनी प्रश्न उपस्थित करत, बिलाची रक्कम राज्य शासनाने भरावी, असा ठराव करण्याची मागणी केली होती. या आधीही शाळांचे थकीत बिल माफ करण्याबाबत राज्य शासनाने सध्या महावितरण विभागावर कर्जाचा बोजा अधिक असून, थकीत बिलांची रक्कम ग्रामपंचायतीमधील स्वनिधी किंवा १५ व्या वित्त आयोगातून द्यावी, अशा सूचना केल्या होत्या. याला सदस्यांनी विरोध केला होता. ग्रामपंचायतींकडे निधी नसल्याने शाळांची बिले भरायची कशी हा प्रश्न त्यांनी उपस्थित केला होता. मात्र, आज मुख्यकार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनीच ग्रामपंचायतींना पत्र काढत ही बिले ग्रामपंचायत निधीमधून भरावीत अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे एकीकडे ग्रामपंचायतीचे आणि दुसरीकडे शाळांच्या वीज बिलांचा बोजा ग्रामपंचायतींवर पडणार आहे.

ग्रामपंचायतींनी ग्रामनिधी मधून ही बिले भरण्याचे सुचवले 

जिल्ह्यात एकूण ३ हजार ६३९ जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत. त्यातील २ हजार ८४७ शाळांमध्ये वीजपुरवठा सुरळीत सुरू आहे, तर १२८ शाळांमध्ये बिल न भरल्यामुळे मीटर काढून नेण्यात आले आहे आणि ६६४ शाळांमधील मीटर जाग्यावर असले तरी वीजजोड तोडण्यात आले आहे. या शाळांमध्ये इ लर्निंग तसेच संगणक वापरता येत नसल्याने अध्ययनात अडचणी येत आहेत. यावर तातडीने कारवाई म्हणून स्थायी सभेत ग्रामपंचायतींनी ग्रामनिधी मधून ही बिले भरण्याचे सुचवले आहे.

तालुकानिहाय परिस्थिती वीजपुरवठा सुरू आणि कशात वीजपुरवठा बंद आकडेवारी

आंबेगाव - २०० (३४), बारामती - २४३ (३५), भोर - २०० (७४), दौंड - २३८ (५२), हवेली - २१२ (१४), इंदापूर - १८३ (१९४), जुन्नर - ३१० (४१), खेड - ३५६ (४६), मावळ - २४३ (३१), मुळशी - १४६ (५०), पुरंदर - १७५ (४३), शिरूर - २१२ (१४६), वेल्हा - १११ (३२)

टॅग्स :PuneपुणेChitra Waghचित्रा वाघNitin Rautनितीन राऊतelectricityवीजMahavikas Aghadiमहाविकास आघाडी