शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

विश्रामगृह नोंदणी प्रक्रिया होणार आॅनलाईन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 11, 2018 18:30 IST

आयबी विश्रामगृहाचा ताबा ठराविक कार्यकर्त्यांनी घेतला असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी अनधिकृतपणे खोल्यांमध्ये राहणा-या व्यक्तींना बाहेर काढण्याची मोहीम पीडब्ल्यूडीकडून हाती घेण्यात आली.

ठळक मुद्देपुण्यातील आयबीसह इतरही सर्व शासकीय विश्रामगृहांचे वाटप सुलभ आणि पारदर्शी पध्दतीने होणार आहे. विश्रामगृहाच्या खोल्यांच्या वितरण व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय

पुणे: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या नियंत्रणाखाली असलेल्या शासकीय विश्रामगृह वितरणात मोठ्या प्रमाणावर गोंधळ होत असल्याने सर्व विश्रामगृहांच्या खोल्यांचे वितरण आॅनलाईन पध्दतीने करण्यात यावे, असा प्रस्ताव विभागातर्फे शासनाला पाठविण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यातील आयबीसह इतरही सर्व शासकीय विश्रामगृहांचे वाटप सुलभ आणि पारदर्शी पध्दतीने होणार आहे.लोकप्रतिनिधी तसेच विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि शासकीय अधिकारी विविध कामानिमित्ताने पुण्यात येत असतात. पुण्यात आलेल्या या व्यक्तींची एक- दोन दिवस किंवा काही दिवस निवासाची व्यवस्था व्हावी, यासाठी शहरात व शहराबाहेर सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे शासकीय विश्रामगृह बांधण्यात आली आहेत. मात्र,गेल्या काही वर्षांपासून ही विश्रामगृह ठराविक व्यक्तींची निवासस्थाने झाली आहेत. तसेच या वसतीगृहाच्या वितरणात गैरव्यवहार होत असल्याचाही आरोप काही संघटनांकडून करण्यात आला. त्यामुळे विश्रामगृहाच्या खोल्यांच्या वितरण व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आयबी विश्रामगृहाचा ताबा ठराविक कार्यकर्त्यांनी घेतला असल्याची बाब प्रशासनाच्या निदर्शनास आली होती. त्यामुळे काही महिन्यांपूर्वी अनधिकृतपणे खोल्यांमध्ये राहणा-या व्यक्तींना बाहेर काढण्याची मोहीम पीडब्ल्यूडीकडून हाती घेण्यात आली. त्यासाठी संबंधित खोल्यांवर नोटीस चिटकविण्यात आली. तसेच पोलीस बंदोबस्तात या खोल्या खाली करण्यात आल्या. संगणकीय प्रणालीच्या माध्यमातून खोल्यांचे वितरण झाल्यास किती खोल्या खाली आहेत.कोणत्या खोलीमध्ये कोणती व्यक्ती किती दिवसांपासून राहत आहे. ही माहिती आॅनलाईन पद्धतीने उपलब्ध होऊ शकणार आहे. त्यामुळे ही आॅनलाईन प्रणाली लवकरात लवकर सुरू व्हावी, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रयत्न केले जात आहेत. शासनाकडे सादर करण्यात आलेल्या प्रस्तावास मंजूरी मिळाल्यांतर लगेचच आॅनलाईन वितरण प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे, असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :PuneपुणेGovernmentसरकारonlineऑनलाइन