राजुगुरुनगर रक्तदान शिबीराला प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:11 IST2020-12-22T04:11:40+5:302020-12-22T04:11:40+5:30

सहकारी बँकेचे संचालक किरण आहेर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून किरण आहेर मित्र मंडळाने शिबीर आयोजिले होते. रक्तदात्यास प्रमाणपत्र ...

Response to Rajugurunagar Blood Donation Camp | राजुगुरुनगर रक्तदान शिबीराला प्रतिसाद

राजुगुरुनगर रक्तदान शिबीराला प्रतिसाद

सहकारी बँकेचे संचालक किरण आहेर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून किरण आहेर मित्र मंडळाने शिबीर आयोजिले होते. रक्तदात्यास प्रमाणपत्र व हेल्मेट भेट देण्यात आले. वाढदिवसानिमित्त आमदार दिलीप मोहिते, पंचायत समिती उपसभापती ज्योती अरगडे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष कैलास सांडभोर, भाजप तालुकाध्यक्ष तथा जि. प. सदस्य अतुल देशमुख, काँग्रेस तालुकाध्यक्ष विजय डोळस, राजगुरूनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष राजेंद्र वाळुंज, कृषी उत्पन्न बाजार समिती अध्यक्ष विनायक घुमटकर, शिवसेना नेते नितीन गोरे व ऍड. विजयसिंह शिंदे, भीमाशंकर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सुरेश कौदरे यांच्यासह सर्वपक्षीय राजकीय व सामाजिक प्रतिनिधींनी आहेर यांना भेटून सदिच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे संयोजन क्लबचे अध्यक्ष कुणाल रावळ, खजिनदार नितीन दोंदेकर, सचिव अंबर वाळुंज, डॉ. सागर गुगळीया, सचिन सावंत, किशोर मावळे, शेखर परदेशी, संतोष काळे, राजेंद्र वाळुंज, जितेंद्र सरडे, विकास भुजबळ, दिनेश जंगम, रेवणनाथ थिगळे यांनी केले.

Web Title: Response to Rajugurunagar Blood Donation Camp