मोफत नेत्रतपासणी शिबिरास प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:08 IST2021-06-28T04:08:45+5:302021-06-28T04:08:45+5:30

या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे आयोजन सुवर्णयुग मित्रमंडळ व लॉकडाऊन क्रिकेट ...

Response to free eye checkup camp | मोफत नेत्रतपासणी शिबिरास प्रतिसाद

मोफत नेत्रतपासणी शिबिरास प्रतिसाद

या शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नगरसेवक प्रेमसुख कटारिया यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रमाचे आयोजन सुवर्णयुग मित्रमंडळ व लॉकडाऊन क्रिकेट क्लब यांनी केले होते. कोरोना महामारीमध्ये अनेक लोकांना डोळे तपासण्यासाठी दवाखान्यात जाता आले नाही. त्यानुसार या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी राष्ट्रवादीचे गटनेते बादशाह शेख, वसिम शेख, अनिल साळवे, नितीन कांबळे, मोहन पडवळकर, शौकत सय्यद, संजय जगताप, अमोल सोनवणे, श्रीकांत थोरात, प्रमोद राणेराजपूत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिरालाल साळवे यांनी केले. कार्यक्रमाचे आयोजक अनिकेत मिसाळ यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास मोहन ओहळ, सूर्यकांत धुमाळ, अनिकेत मिसाळ , शुभम ढाळे,अक्षय मिसाळ,अविनाश धुमाळ, प्रतीक वाघमारे, सिद्धेश कांबळे,ओंकार चव्हाण, सचिन साळवे,सनी बनसोडे,योगेश चेट्टीयार, अझर शेक,प्रवीण अस्वरे, अमोल दिघे नितीन लोंढे, चांद शेख, सागर तारू यांचे सहकार्य मिळाले.

Web Title: Response to free eye checkup camp