महापालिकेने उभारलेल्या महिलांच्या व्यायामशाळांना मिळेना प्रतिसाद

By Admin | Updated: November 4, 2014 04:07 IST2014-11-04T04:07:06+5:302014-11-04T04:07:06+5:30

महिलांसाठी दैनंदिन जीवनात व्यायाम ही नित्याची गरज आहे. मात्र, महापालिकेच्या महिलांच्या व्यायामशाळांना शहरात अल्प प्रतिसाद मिळत आहे.

Responding to the Gymnasium's Gymnasium's Gymnasium | महापालिकेने उभारलेल्या महिलांच्या व्यायामशाळांना मिळेना प्रतिसाद

महापालिकेने उभारलेल्या महिलांच्या व्यायामशाळांना मिळेना प्रतिसाद

सुवर्णा नवले, पिंपरी
महिलांसाठी दैनंदिन जीवनात व्यायाम ही नित्याची गरज आहे. मात्र, महापालिकेच्या महिलांच्या व्यायामशाळांना शहरात अल्प प्रतिसाद मिळत आहे. महापालिकेच्या व्यायामशाळाकडे महिलांचा कल कमी दिसून येत आहे. शहरातील ७ ते ८ ठिकाणच्या महिलांच्या व्यायामशाळा बंद पडल्या आहेत.
खराळवाडी, सुदर्शननगर, काकडे पार्क, चिंचवडगाव येथील महिलांच्या व्यायामशाळा सध्या बंद अवस्थेत आहेत. व्यायामाची यंत्रसामग्री धूळखात पडली आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. महिलांची कौटुंबिक दुहेरी जबाबदारी संभाळत असताना महिलांचे आरोग्याकडे दुर्लक्ष असते. मात्र महिलांच्या व्यायामशाळाबाबत जनजागृती होणे महत्त्वाचे आहे.
व्यायामशाळांना महिना १० रूपये शुल्कतत्त्वावर या व्यायामशाळा महिलांसाठी उपलब्ध आहेत.मात्र, निगडीतील फ क्त १ व्यायामशाळा सध्या चालू आहे. महापालिकेच्या एकूण व्यायामशाळा ७२ आहेत. पुरूषांच्या व्यायामशाळेच्या तुलनेत महिलांच्या व्यायामशाळा नगण्य आहेत. महापालिकेच्या महिलांच्या व्यायामशाळा अवध्या 3 आहेत. यात महिला आपल्या वेळेनूसार येतात व योगा अथवा इतर कामे केली जातात. महिला आरोग्याच्या दृष्टीने तुलनेत शहरात व्यायाम शाळाची स्थिती दयनीय आहे.

Web Title: Responding to the Gymnasium's Gymnasium's Gymnasium