योगशिक्षक प्रशिक्षक कार्यशाळेस प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2015 23:36 IST2015-06-18T23:36:45+5:302015-06-18T23:36:45+5:30
पिंपरी-चिंचवड शहर भारत स्वाभिमान न्यास, पतंजली योग समिती यांच्या वतीने महापालिका व खासगी शाळेतील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या

योगशिक्षक प्रशिक्षक कार्यशाळेस प्रतिसाद
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहर भारत स्वाभिमान न्यास, पतंजली योग समिती यांच्या वतीने महापालिका व खासगी शाळेतील शिक्षकांसाठी आयोजित केलेल्या योगशिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेस पहिल्याच चांगला प्रतिसाद मिळाला.
भोसरीतील भगतवस्ती येथील शिवयोगी इमारत येथे दि. १८ ते २० जूनदरम्यान ही कार्यशाळा आयोजित केली आहे. उद्घाटन महापालिका शिक्षण मंडळाचे उपसभापती श्याम अगरवाल यांच्या हस्ते करण्यात आले. भारत स्वाभिमान न्यासचे जिल्हा प्रभारी धनिलाल यादव, प्राचार्य शिवलिंग ढवळेश्वर, दत्ता गायकवाड, अनिल पोखर्णीकर, कुंदन कारकी आदी उपस्थित होते. कार्यशाळेत महापालिका व खासगी शाळेतील १००पेक्षा अधिक शिक्षकांनी सहभाग घेतला आहे.
या वेळी अगरवाल म्हणाले, ‘‘शाळांमध्ये विविध खेळांचे प्रशिक्षण देण्यात येते. मात्र,
भारताची सर्वांत मोठी परंपरा असणाऱ्या योगविद्येबाबत विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची माहिती दिली जात नाही.
त्यामुळे आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून राज्य सरकारने अभ्यासक्रमामध्ये योगासन विषयाचा समावेश करण्याचा घेतलेला निर्णय हा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा आहे.’’
या वेळी कुंदन कारकी यांनी
सर्व शिक्षकांना योगाची
प्रात्यक्षिके करून दाखविली. तसेच योगदिनाच्या कार्यक्रमाचे प्रशिक्षण दिले. (प्रतिनिधी)