मंचरला कृषी प्रदर्शनास प्रतिसाद
By Admin | Updated: January 9, 2015 23:20 IST2015-01-09T23:20:38+5:302015-01-09T23:20:38+5:30
आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने आयोजित शेतकरी कृषी प्रदर्शनात आधुनिकता असून, शहरांच्या तोडीचे कृषी प्रदर्शन येथे भरविले जाते,

मंचरला कृषी प्रदर्शनास प्रतिसाद
मंचर : आंबेगाव तालुका खरेदी-विक्री संघाच्या वतीने आयोजित शेतकरी कृषी प्रदर्शनात आधुनिकता असून, शहरांच्या तोडीचे कृषी प्रदर्शन येथे भरविले जाते, असे गौरवोद्गार शरद सहकारी बँकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी काढले.
खरेदी-विक्री संघाच्या वतीने सलग पाचव्यांदा मंचर येथे आयोजित ‘शेतकरी कृषी प्रदर्शन २०१५’चे उद्घाटन शहा यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार पोपटराव गावडे होते. या वेळी भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष देवदत्त निकम, उपाध्यक्ष बाळासाहेब बेंडे, सभापती जयश्री डोके, सभापती प्रकाश घोलप, खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विवेक वळसे पाटील, बबनराव कुऱ्हाडे, राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाळासाहेब बाणखेले, युवक अध्यक्ष सचिन भोर, सूत्रसंचालन सभापती सुभाष मोरमारे, पोलीस निरीक्षक मोहन जाधव, तालुका कृषी अधिकारी हिरामण शेवाळे, सहायक निबंधक बी. आर. माळी, जिल्हा परिषद सदस्या रेवती वाडेकर, सुषमाताई शिंदे, प्रियंका लोखंडे, अध्यक्षपदी संजय गवारी, खंडू पारधी, महेश मोरे, साईनाथ पतसंस्थेचे अध्यक्ष गिरीश समदडिया आदी उपस्थित होते.
शहा बोलताना पुढे म्हणाले, की येथील कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी जिल्हा व बाहेरील शेतकरी येतात. विविध स्टॉलवर गर्दीतर होतेच, तसा व्यवसायही मोठ्या प्रमाणात होतो. यापुढील काळात शेतीला अजून महत्त्व येणार आहे. त्यामुळे अशा प्रकारची कृषी प्रदर्शने उपयुक्त ठरतील. यापुढे प्रदर्शनात तीन दिवस नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच कार्यशाळा सुरू करण्याची सूचना शहा यांनी केली.
पोपटराव गावडे म्हणाले, की समाजासाठी व शेतकऱ्यांसाठी शेतकरी कृषी प्रदर्शन उपक्रमाद्वारे विवेक वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खरेदी-विक्री संघ चांगले काम करत आहे. सामान्य शेतकऱ्यांना दिशा देण्याचे काम संघामार्फत केले जाते.
प्रास्ताविक करताना खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष विवेक वळसे पाटील म्हणाले, की मंचर येथे होणारे कृषी प्रदर्शन ग्रामीण भागात नावाजलेले आहे. कृषी प्रदर्शन आयोजित करण्याची परंपरा व ते ग्रामीण भागात नावाजलेले आहे.
कृषी प्रदर्शन आयोजित करण्याची परंपरा व ते ग्रामीण भागात भरविण्याची संधी संघाला मिळाली आहे. त्यासाठी सहकार्य करणाऱ्या सर्वांचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. पोलीस निरीक्षक मोहन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच
नीलेश थोरात यांनी आभार
मानले. (वार्ताहर)