राधा खुडे हिचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:07 IST2021-07-12T04:07:51+5:302021-07-12T04:07:51+5:30

वालचंदनगर येथील राधा खुडे या तरुणीने सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंदापूर तालुक्याचेच नाव उज्वल ...

Respect to Radha Khude | राधा खुडे हिचा सत्कार

राधा खुडे हिचा सत्कार

वालचंदनगर येथील राधा खुडे या तरुणीने

सूर नवा ध्यास नवा या कार्यक्रमाच्या निमित्ताने इंदापूर तालुक्याचेच नाव उज्वल केले असल्याचे प्रतिपादन

माजी बांधकाम व आरोग्य सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य प्रविण माने यांनी केले.

माने यांनी राधा खुडे हिचा घरी जाऊन सत्कार केला. यावेळी ते बोलत होते. राधाची पार्श्वभूमी गरीबीची असून, खूप हलाकीच्या परिस्थितीतून शिक्षण व गायनाचा आपला हा प्रवास राधाने पूर्ण केला आहे. त्यामुळेच आजच्या या सत्कारासह माने यांनी राधाला २५ हजार रुपयांची मदत केली.

राधा खुडे इंदापूरचा अभिमान असून तिच्या पाठीशी भक्कमपणाने उभे राहणेच आपले आद्य कर्तव्य असल्याचे प्रतिपादन यावेळी माने यांनी केले. यावेळी राजेश जामदार, बाळासाहेब गायकवाड, गौरव पवार, राहुल रणमोडे, गणेश लंबाते व मान्यवर उपस्थित होते.

प्रविण माने यांनी राधा खुडे हिचा घरी जाऊन सत्कार केला

Web Title: Respect to Radha Khude