वानवडीतील समस्या सोडविल्या : महापौर
By Admin | Updated: February 14, 2017 02:19 IST2017-02-14T02:19:49+5:302017-02-14T02:19:49+5:30
वॉर्डात मी ९२ कोटींची विकासकामे केली. पायाभूत सुविधांना प्राधान्य देऊन रस्ते सुधारणा, पथदिवे, चौकांचे सुशोभीकरण

वानवडीतील समस्या सोडविल्या : महापौर
हडपसर : वॉर्डात मी ९२ कोटींची विकासकामे केली. पायाभूत सुविधांना प्राधान्य देऊन रस्ते सुधारणा, पथदिवे, चौकांचे सुशोभीकरण, नियमित पाणी व्यवस्थापन, जॉगिंग पार्क, फुटपाथ या गोष्टींसह वानवडी पोलीस चौकी व क्रीडा मैदानासाठी आरक्षणे मंजूर करून घेतली. वानवडीतील नागरिकांनी दिलेली प्रेरणाच मला वानवडीसह पुणे शहराच्या विकासाची नवी उमेद देत असते. राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दाखविलेल्या विश्वासामुळेच वानवडी गावाला महापौरपद मिळाले, असे महापौर प्रशांत जगताप यांनी सांगितले.
महापौरपद जगताप यांच्याकडे असल्याने व गेली १० वर्षे या भागात राष्ट्रवादी पक्षाच्या माध्यमातून विविध विकासकामे झाली आहेत. सर्वसामान्य जनतेशी नाळ जोडणारा कार्यकर्ता म्हणून जगताप यांची ओळख असल्याने प्रचारादरम्यान राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मतदारांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे उमेदवारांनी सांगितले.
महापालिकेच्या प्रभाग क्र. २५ (वानवडी)मधून महापौर प्रशांत जगताप, त्यांच्या मातोश्री माजी नगरसेविका रत्नप्रभा जगताप, दिलीप जांभूळकर आणि कांचन जाधव हे चार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
उमेदवारांनी वानवडी गावात होलेमळा, जांभूळकरमळा, वानवडी गावठाण, तात्या टोपे सोसायटी, परमारनगर, धाडगेनगर, चौगुलेमळा या भागात प्रचार काढला. या वेळी सरोज जांभूळकर, सीमा होले, इंदू शिंदे, विठ्ठल चौघुले, नंदू होले, विकास शिंदे, अनिल रोकडे, दत्तात्रय शिंदे, धनंजय लोंढे,
नाना सांडभोर, मारी गव्हाणे, विजया रोकडे, सुनीता जाधव, स्मिता बरवे, दत्तात्रय शिंदे, अतुल भाटे आदी सहभागी झाले होते.