लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : पारगाव तर्फे अवसरी बु्र. (ता.आंबेगाव) गावच्या ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव संमत करण्यात आला. पारगाव गावात नवीन दारू दुकानांना परवानगी देऊ नये, बेकायदेशीर धंदे तातडीने बंद करण्याचा ठराव सर्वसंमतीने मांडण्यात आला.आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील पारगाव तर्फे अवसरी बुद्रुक गावची ग्रामसभा पार पडली. अध्यक्षस्थानी उपसरपंच भाऊसाहेब ढोबळे हे होते. ग्रामसभेत दारूबंदीचा ठराव संमत करण्यात आला. पारगाव गावात बेकायदेशीर दारूविक्री बंद व्हावी यासाठी मंचर पोलीस ठाण्यात ग्रामस्थांनी अर्ज दिले आहेत, मात्र त्याची दखल घेतली नाही. दारूमुळे तरुण वर्ग व्यसनाकडे वळू लागला आहे. त्यामुळे गावात संपूर्ण दारूबंदी करण्याचा ठराव करण्यात आला. चंद्रकांत पिराजी लोखंडे यांनी ही सूचना मांडली त्यास योगश महाराज राऊत यांनी अनुमोदन दिले. या वेळी झालेल्या चर्चेत दीपक ढोबळे, ओमकार ढोबळे, नामदेव पुंडे, अक्षय ढोबळे, सुशीला ढोबळे आदींनी सहभाग घेतला.
अवसरी बुद्रुक येथे दारूबंदीचा ठराव
By admin | Updated: May 10, 2017 03:50 IST