१०५ जणांचा नेत्रदानाचा संकल्प
By Admin | Updated: June 2, 2014 02:12 IST2014-06-02T02:02:20+5:302014-06-02T02:12:04+5:30
येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नेत्रदान व स्वच्छता अभियान राबविण्यात आले

१०५ जणांचा नेत्रदानाचा संकल्प
पिंपळे गुरव : येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी प्रतिष्ठानच्या वतीने पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त नेत्रदान व स्वच्छता अभियान राबविण्यात आले. नेत्रदानाविषयी जनजागृतीकरिता मरणोत्तर नेत्रदानाचे मोफत अर्ज भरण्यात आले. १०५ जणांनी स्वयंस्फूर्तीने नेत्रदानाचा संकल्प केला. अहल्यादेवीच्या प्रतिमेला बाळासाहेब काकडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष किसन फसके उपस्थित होते. पिंपळे गुरव परिसर व सुदर्शननगर भागात स्वच्छता अभियान राबवून स्वच्छ करण्यात आला. आपल्या घराजवळील परिसर अस्वच्छ राहणार नाही, असा संकल्प केला. अनुराज दुधभाते, मल्हारी कुचेकर, नीलेश हुगे, नीलेश गाडेकर, दिनेश गाढवे, पुनम वाघे, अमृता चोधे आदींनी केले. अविनाश भडारे यांनी आभार तर सूत्रसंचालन प्रदीप गायकवाड यांनी मानले. (प्रतिनिधी)