राजीनामानाट्य रंगले
By Admin | Updated: January 10, 2015 00:59 IST2015-01-10T00:59:09+5:302015-01-10T00:59:09+5:30
सभापती, उपसभापतींची एक वर्षाची मुदत संपुष्टात आल्याने त्या पदावर संधी मिळावी, यासाठी आतुर झालेल्या इच्छुकांकडून त्यांचे राजीनामे घेण्यासाठी दबावतंत्राचा अवलंब होऊ लागला आहे.

राजीनामानाट्य रंगले
पिंपरी : शिक्षण मंडळ सभापती, उपसभापतींची एक वर्षाची मुदत संपुष्टात आल्याने त्या पदावर संधी मिळावी, यासाठी आतुर झालेल्या इच्छुकांकडून त्यांचे राजीनामे घेण्यासाठी दबावतंत्राचा अवलंब होऊ लागला आहे. सभापती, उपसभापतींनी अखेर राजीनामे दिले, अशी चर्चा शहरात पसरली असताना, पक्षनेत्या मंगला कदम यांनी मात्र आपल्याकडे कोणीच अद्याप राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट केले.
शिक्षण मंडळाचे सभापती फजल शेख आणि उपसभापती सविता खुळे यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. अशी चर्चा दुपारपासून महापालिका वर्तुळात रंगली. प्रत्यक्षात पक्षनेत्यांकडे कोणीच राजीनामा दिलेला नव्हता. उपसभापती सविता खुळे यांचे राजीनामा पत्र घेऊन शिक्षण मंडळाचे काही सदस्य पक्षनेत्यांच्या कक्षात गेले. परंतू चित्रपट महोत्सवाच्या उद्घाटन समारंभास त्या निघून गेल्या असल्याने खुळे यांचे राजीनामा पत्र सदस्यांकडेच राहिले.
सभापती शेख यांनीही राजीनामा दिला असावा, अशी खुळे यांची समज झाली. परंतू त्यांनी चौकशी केली असता, शेख यांनी राजीनामा दिला नसल्याचे स्पष्ट झाले. शेख यांना विचारणा केली असता, अशा पद्धतीने हस्ते परहस्ते राजीनामा देता येत नाही. मागील आठवड्यात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा देण्याबाबत सुचवले
आहे. आपल्या कारकिर्दीत क्रीडा स्पर्धा व्हाव्यात. अशी आपली इच्छा असून स्पर्धा होताच राजीनामा
देणार अशी भूमिका त्याच बैठकीत व्यक्त केली आहे. असे सभापती शेख यांनी नमूद केले. शुक्रवारी कोणीही पक्षनेत्यांकडे राजीनामे दिलेले
नाहित. हे सर्वांशी चर्चा केल्यानंतर स्पष्ट झाले आहे. (प्रतिनिधी)
४शिक्षण मंडळ सभापती, उपसभापतीपदाच्या राजीनाम्यासंदर्भात शिक्षणमंडळाचे कालपासून संपर्कात आहेत. ज्यांना राजीनामा द्यायचा आहे, त्यांनी शुक्रवारी सकाळी ११ वाजता यावे, असे सांगितले होते. परंतू तेव्हा कोणीही आले नाही. सायंकाळी ५ च्या सुमारास कार्यालयात काही सदस्य आले हे समजले. परंतू आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्वसाच्या उद्घाटनाला बाहेर पडल्याने त्यांची कोणाशी भेटच झाली नाही. त्यामुळे राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवला नाही. त्यांना राजीनामा द्यायचा असेल तर दुसऱ्या शनिवारी महापालिका कामकाज बंद असले तरीही उपस्थित राहण्याची तयारी आहे. त्यांनी राजीनामा देण्यासाठी यावे.