रेश्मा भोसले यांचा भाजपाचा अर्ज रद्द
By Admin | Updated: February 6, 2017 01:10 IST2017-02-06T01:10:15+5:302017-02-06T01:10:15+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका रेश्मा भोसले तसेच भाजपचे उमेदवार सतीश बहिरट या दोघांनाही भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह नाकारण्यात आले असून त्यांची

रेश्मा भोसले यांचा भाजपाचा अर्ज रद्द
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी विद्यमान नगरसेविका रेश्मा भोसले तसेच भाजपचे उमेदवार सतीश बहिरट या दोघांनाही भारतीय जनता पक्षाचे निवडणूक चिन्ह नाकारण्यात आले असून त्यांची अपक्ष म्हणून नोंद करण्यात आली आहे़
घोले रोड क्षेत्रीय कार्यालयाच्या निवडणूक अधिकारी विजया पांगारकर यांनी रात्री आठ वाजता हा निर्णय दिला़ भोसले यांना राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला़ तोपर्यंत त्यांनी आॅनलाईन राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवारी अर्ज भरला होता़ दुपारी चार वाजता अर्जाची छाननी सुरु झाली तेव्हा काँग्रेसचे उमेदवार दत्ता बहिरट व भाजपचे उमेदवार सतीश बहिरट यांनी भोसले यांच्या अर्जाला हरकत घेतली़ तेव्हा भोसले यांच्या वकीलाने म्हणणे मांडले़ निवडणूक आयोगाने ६ जानेवारी २००७ मध्ये एक अधिसूचना काढली होती़ त्यात जर एकाच पक्षाने एकाच जागेसाठी एका पेक्षा अधिक ए व बी फॉर्म देण्यात येतात़ (प्रतिनिधी)