रेश्मा भोसले यांनी मतदारांशी पदयात्रेद्वारे साधला संवाद

By Admin | Updated: February 15, 2017 02:36 IST2017-02-15T02:36:50+5:302017-02-15T02:36:50+5:30

प्रभाग क्रमांक ७ ड मधील भारतीय जनता पक्ष पुरस्कृत उमेदवार रेश्मा भोसले यांनी मंगळवारी पाटील इस्टेट, महात्मा गांधी वसाहत

Reshma Bhosale organized a dialogue with the voters | रेश्मा भोसले यांनी मतदारांशी पदयात्रेद्वारे साधला संवाद

रेश्मा भोसले यांनी मतदारांशी पदयात्रेद्वारे साधला संवाद

पुणे : प्रभाग क्रमांक ७ ड मधील भारतीय जनता पक्ष पुरस्कृत उमेदवार रेश्मा भोसले यांनी मंगळवारी पाटील इस्टेट, महात्मा गांधी वसाहत परिसरातून पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क साधला़
पाटील इस्टेटमधील मतदारांनी रेश्मा भोसले यांचे औक्षण करून स्वागत केले़ या वेळी भोसले यांनी या प्रभागाच्या विकासासाठी आपण आजवर केलेल्या विविध कामांची माहिती नागरिकांना दिली़ गोरगरिबांना महापालिकेच्या विविध योजनांमार्फत मिळवून दिलेल्या मदतीची माहिती दिली़ अंगारकी चतुर्थी असल्याने पाटील इस्टेट, महात्मा गांधी वसाहतीतील विविध गणेश मंडळांच्या गणपती मंदिरांना त्यांनी भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला़ निवडणुकीत उतरण्यामागील आपली भूमिका त्यांनी विशद केली़
या पदयात्रेत देविदास देवकर, श्रावण सोनावणे, बापू गायकवाड, जब्बार पटेल, गणेश पगारे, संतोष लंकेश्वर, सूर्यकांत सर्वगौड, गोवर्धन वाघिरे, विशाल कारळे, इमरान इनामदार, लक्ष्मी कांबळे, शालन पगारे, शब्बू अप्पा, कल्पना शिंदे, शोभा झेंडे, मंगल गायकवाड, शोभा कांबळे, गौरी शेंडगे, गुणा सर्वगौड, सुमन सर्वगौड, सारिका वाघमारे, सुवर्णा मकापल्ले आदी सहभागी झाले होते़ (प्रतिनिधी)

Web Title: Reshma Bhosale organized a dialogue with the voters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.