शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘जयकर’ डिजिटल लायब्ररीची अभ्यासकांना अद्याप प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2019 03:41 IST

दुर्मिळ चित्रपटांपासून दूरच; चार वर्षे गेली उलटून

पुणे : राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या आवारातील जयकर बंगल्यात साकार होत असलेल्या ‘डिजिटल लायब्ररी’मध्ये खजिन्यातल्या दुर्मिळ चित्रपटांचा आस्वाद संगणकावर पाहण्याची संधी चित्रपटप्रेमी आणि अभ्यासकांना मिळणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र चार वर्षे उलटली तरी अद्याप या लायब्ररीच्या उद्घाटनाला मुहूर्त लागलेला नाही. ही लायब्ररी कधी सुरू होणार? असा सवाल अभ्यासक, तज्ज्ञ आणि रसिकांकडून उपस्थित केला जात आहे.दरम्यान, या वास्तूमध्ये बॅरिस्टर जयकर यांच्या स्मृती जपल्या जाव्यात या दृष्टीने संग्रहालयाकडून प्रयत्न सुरू आहेत. जयकर यांच्या कुटुंबीयांशी संपर्क झाला असून, त्यांनी सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. येत्या दोन महिन्यांत ‘डिजिटल लायब्ररी’ सुरू केली जाईल, असे स्पष्टीकरण संग्रहालयाचे संचालक प्रकाश मगदूम यांनी दिले आहे.गेली अनेक वर्षे एनएफएआयच्या आवारातील जयकर बंगला धूळ खात पडून होता. याच बंगल्यात पुणे विद्यापीठाची आखणी करण्यात आली होती. पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू बॅरिस्टर मुकुंदराव जयकर यांचे १९४७ ते १९५६ या काळात बंगल्यात वास्तव्य होते. त्यानंतर १९६४ मध्ये येथे राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय सुरू झाल्याने बंगल्याची मालकी संस्थेकडे गेली. बंगल्याला ‘मातृस्मृती’चे नाव आहे. मात्र तो जयकर बंगला याच नावाने प्रसिद्ध आहे. या बंगल्यात एफटीआयआयचे मुलींचे वसतिगृह होते. तिथे अभिनेत्री जया भादुरी, शबाना आझमी, गीता खन्ना तसेच पार्वती मेनन यांचे वास्तव्य होते. एफटीआयआयच्या संचालकाचे कार्यालय येथे होते. मात्र, काही काळानंतर तेही बंद झाल्याने हा बंगला वापराविना पडून होता. त्यामुळे जयकर बंगल्यात चित्रपटप्रेमींसाठी डिजिटल लायब्ररी उभारण्याचा प्रकल्प संग्रहालयातर्फे हाती घेण्यात आला. या बंगल्याला हेरिटेज वास्तूचा दर्जा असल्याने टप्प्याटप्प्याने नूतनीकरण करण्यात आले. चार वर्षांच्या नूतनीकरणातून बंगल्याला नवी झळाळी प्राप्त झाली. अप्रतिम लाकडी कलाकुसर हे या बंगल्याचे वैशिष्ट्य आहे. बंगल्याचे नूतनीकरण करताना मूळ वास्तूला कोणताही धक्का लावण्यात आलेला नाही.नूतनीकरण झाले पूर्ण...जयकर बंगल्याचे नूतनीकरण पूर्ण झाले आहे. डिजिटल लायब्ररीसाठी आवश्यक स्क्रीन तसेच कॉम्प्युटर व इलेक्ट्रॉनिक साहित्य संग्रहालयाला उपलब्ध झाले असून लवकरच जोडणीचे काम पूर्ण केले जाईल, असे संग्रहालयाकडून सांगण्यात आले आहे.या बंगल्यात बँरिस्टर जयकर यांचे छोटेखानी स्मारक करण्याचा मानस आहे. जयकर कुटुंबीयांकडून जयकर यांची दुर्मीळ छायाचित्रे मिळण्याची विनंती करण्यात आली आहे. त्यांनीही सहकार्य करण्याचे मान्य केले आहे. याशिवाय जयकर बंगल्याचे डिझाइन कुणी केले? वास्तुरचनाकार कोण होता? याच्या माहितीबरोबरच जयकर यांनी ‘स्टोरी आॅफ माय लाइफ’ नावाने त्यांचे आत्मचरित्र लिहिले आहे. त्याचा १९५८ च्या फिल्म मॅगझिनमध्ये उल्लेख आहे. ते देखील आम्ही मिळविण्याचा प्रयत्न करीत आहोत. दोन महिन्यांत ही डिजिटल लायब्ररी खुली केली जाईल- प्रकाश मगदूम, संचालक एनएफएआय