ठेकेदाराविरोधात महावितरणला निवेदन
By Admin | Updated: December 24, 2016 00:47 IST2016-12-24T00:47:54+5:302016-12-24T00:47:54+5:30
कोंढवा बुद्रुक, लक्ष्मीनगर, आश्रफनगर, शिवशंभोनगर, आंबेडकरनगर, श्रद्धानगर या भागांतील एमएसईबीच्या ठेकेदाराच्या गैरकारभारामुळे

ठेकेदाराविरोधात महावितरणला निवेदन
पुणे : कोंढवा बुद्रुक, लक्ष्मीनगर, आश्रफनगर, शिवशंभोनगर, आंबेडकरनगर, श्रद्धानगर या भागांतील एमएसईबीच्या ठेकेदाराच्या गैरकारभारामुळे वीजबिल अनेक महिन्यांपासून घरपोच येत नसल्यामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यांना विनाकारण व्याज व दंड भरावा लागत आहे.
या सर्व प्रकरणाची दखल स्वराज्य निर्माण सेनेचे पुणे शहर अध्यक्ष मनोज भिंगारदिवे यांनी घेतली. त्यांनी नागरिकांच्या वतीने कार्यकारी अभियंता सुरेंद्र ताडे यांना निवेदन दिले. ताडे यांनी प्रकरण समजून घेऊन लवकरात लवकर कारवाई करू, असे आश्वासन दिले.
याप्रसंगी अरविंद गोड, अक्षय वाचकटे, प्रदीप ढावरे, मोहसीन सय्यद, निखिल भिंगारदिवे, किरण निकम, सागर शिंदे, सुदेश सोनवणे, शुभम धाडेकर, हेमंत धाडेकर, सूरज आलेकर, सचिन शिंदे, जुबेर अन्सारी, आकाश फाळके, अजय शिंगे व आदी स्थानिक नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते.