शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

'रामदास आठवले तुम्ह आगे बढो' म्हणत रिपब्लिकनच्या कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2019 20:58 IST

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मोदी सरकार दोनमध्ये केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पुण्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला.

पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (A) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मोदी सरकारमध्ये केंद्रीय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल पुण्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी पुणे रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक कांबळे, पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष आयुब शेख, नगरसेविका सुनीता वाडेकर,आदी पदाधिकारी उपस्थित होते. अशोक कांबळे म्हणाले, "आमचे नेते रामदास आठवले यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे. समाजाच्या हितासाठी आठवले साहेबांनी काम केले आहे. पक्षाच्या वतीने त्यांचे खूप अभिनंदन करतो. आम्हा कार्यकर्त्यांची फौज नेहमी तुमच्या पाठीशी आहे."बाळासाहेब जानराव म्हणाले, "संविधानाचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आठवले साहेब कायम सजग असतात. समाजात मिसळणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. गेल्या पाच वर्षात चांगले काम केले आहे. पुढील काळात ते समाजाच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतील, असा विश्वास वाटतो."परशुराम वाडेकर म्हणाले "रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाचे पाहिले असे नेते आहेत, ज्यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले आहे. त्याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी नेहमी नरेंद्र मोदी आणि आठवलेंना पाठिंबा देतील. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की, रामदास आठवलेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे. आता साहेबांना चांगले खाते मिळावे, अशी अपेक्षा आहे."'रामदास आठवले तुम्ह आगे बढो' ,  'डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, रिपब्लिकन पार्टीचा विजय असो', 'छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो' अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.

टॅग्स :Ramdas Athawaleरामदास आठवलेPuneपुणे