विद्यार्थ्यांविना शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:20 IST2021-02-05T05:20:00+5:302021-02-05T05:20:00+5:30
पुणे : कोरोना योद्धांचा सत्कार, अन्नदान, खाऊ आणि तिळगूळ वाटप असे सामाजिक उपक्रम राबवून शहरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा ...

विद्यार्थ्यांविना शाळांमध्ये प्रजासत्ताक दिन
पुणे : कोरोना योद्धांचा सत्कार, अन्नदान, खाऊ आणि तिळगूळ वाटप असे सामाजिक उपक्रम राबवून शहरात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या अनुपस्थितीत शिक्षक आणि शालेय कर्मचारी यांच्या वतीने ध्वजारोहण करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व ठिकाणी फिजिकल डिस्टन्सिंगचे नियम पाळून कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
प्रियदर्शनी शिक्षण संस्था :
महेश कुंभार यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. या वेळी संस्थापिका शशिकला कुंभार, शिक्षक-शिक्षिका उपस्थित होत्या. शशिकला कुंभार यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्त्व सांगितले.
कॅम्प येथील सुप्रिया बुद्धविहारमध्ये संकल्प मित्र परिवार :
सचिव डॉ. सुरेश कठाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. या वेळी परिवाराचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर वाघमारे, सुधाकर कांबळे, सुनिंद वाघमारे उपस्थित होते.
सेंट अँड्र्यूज हायस्कूल फॉर गर्ल्स शाळा :
आरोग्य निरीक्षक संदीप रोकडे, मुख्याध्यापिका कविता शेरे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. तसेच रोकडे यांचा कोविड योद्धा म्हणून सत्कार केला. या वेळी शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांना ध्वजारोहण कार्यक्रम ऑनलाइनच्या माध्यमातून दाखवला.
आदर्श ग्रुप :
ताडीवाला रस्त्यावरील भाजी मार्केट येथे गुपच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आनंद सवाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण कले. या वेळी रितीक सवाणे, शुभम माने, साहिल परब, आकाश वाघ उपस्थित होते.
सम्यक एकता पेंटर रोजंदार संस्था :
नगरसेवक प्रदीप गायकवाड आणि महेबूब नदाफ यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. या वेळी राजा जोगदंड, लाला लोंढे, श्याम जाधव, अनिल शिंदे, रफिक शेख उपस्थित होते.
राजीव गांधी विचार प्रसारक मंडळ ट्रस्ट :
ससून क्वार्टर्स येथे संस्थेचे कायदेशीर सल्लागार कांतीलाल संचेती यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. या वेळी नगरसेवक विनोद निनारिया, नरोत्तम चव्हाण, भिकारचंद मेमजादे, राजू बारसे उपस्थित होते.
कॅम्प येथील विरवाणी प्लाझा येथे महाराष्ट्र मुस्लिम फ्रंट :
कॅप्टन सिद्धीकी यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. या वेळी संस्थापक अध्यक्ष नदीम मुजावर, शहाजी सावंत, सुल्तान नाजा, बशीर शेख उपस्थित होते.
शिवाजीनगर भागातील मृत्युंजय मित्र मंडळ :
वकिलांच्या ग्राहक सोसायटीचे संचालक फैयाज शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. या वेळी मंडळाचे अध्यक्ष तुषार पंडित, मंगेश खेडेकर, रोहित पंडित, स्वप्नील सूर्यवंशी उपस्थित होते.
ज्ञानदीप महिला प्रतिष्ठान :
दलित मित्र संघटना महाराष्ट्र प्रदेश सचिव नरोत्तम चव्हाण यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. या वेळी प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.
एस. एस. धोत्रे फाउंडेशन :
दीप बंगला येथील ओम सुपर मार्केट चौकात फाऊंडेशनच्या वतीने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते गोपाळ तिवारी यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. यावेळी फैयाज शेख, गोविंद जाधव, राहुल वंजारी उपस्थित होते.
आबासाहेब अत्रे दिन प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय :
ज्येष्ठ शिक्षिका आयेशा डांगे यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. या प्रसंगी दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब अत्रे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील मराठी व इंग्रजी दिन व रात्र प्रशालेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
स्वामी बॅग्स आणि प्रसन्न जगताप मित्र परिवार :
सिंहगड पोलीस स्टेशनच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक किट व तिळगुळ देऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक देविदास घेवारे, गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद वाघमारे, राहुल जगताप, किशोर कुलकर्णी उपस्थित होते.
शहीद अब्दुल हमीद तरुण मंडळ :
सामाजिक कार्यकर्त्या छाया वारभुवन आणि वीर मित्र मंडळाचे माजी अध्यक्ष राजेंद्र सोनार यांच्या हस्ते ध्वजारोहण केले. यावेळी माजी नगरसेवक मुख्तार शेख, विजय वारभुवन, विकार शेख, युनूस शेख, राजू शेख उपस्थित होते.
मी टू वुई मिशन २०३४ या सामाजिक संस्था :
डॉ. दीपक तोष्णीवाल यांना कोरोना महामारीच्या काळात केलेल्या सामाजिक सेवेसाठी कोव्हिडं योद्धा पुरस्काराने सन्मानित केले. यावेळी अभिनेता सुयश टिळक, अभिनेत्री राधिका देशपांडे, प्रिया पारीख, सोनाली गार्गी उपस्थित होते.
फोटो : आबासाहेब अत्रे दिन प्रशाला आणि कनिष्ठ महाविद्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडा वंदन उत्साहात साजरे करण्यात आले.