शहरं
Join us  
Trending Stories
1
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
2
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
3
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
4
Top Marathi News LIVE Updates: 'मविआ'कडून अंबादास दानवे विधान परिषदेचे उमेदवार- आदित्य ठाकरे
5
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
6
IPL 2026: वैभव सूर्यवंशी असेच षटकार मारत राहिला तर मोडणार ख्रिस गेलचा १४ वर्ष जुना विक्रम
7
पेट्रोल नाही! लवकरच धावणार 100% इथेनॉलवर चालणारी वाहने; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, पाहा काय आहे नवीन 'E100' प्लॅन?
8
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
9
सरकारी नोकरीत रिजेक्टचा ठपका; मग एका रात्रीत 'करोडपती' होऊन विदर्भकर IPL स्टार कसा बनला?
10
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
11
भ्रष्टाचाराची तक्रार केली, ग्राम प्रमुखाला जेव्हा कळलं तेव्हा झाला 'मोठ्ठा कांड'! काय घडलं?
12
Travel Tips: फिरण्याची आवड आहे पण खिशाला परवडत नाही? जगभ्रमंतीची 'अशी' फिटवा हौस 
13
"दिग्दर्शक रात्री खोलीत शिरला, केली घाणेरडी मागणी"; अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव
14
IMDb Play Trick: सावधान! IMDb वर मोफत चित्रपट पाहण्याचा 'हा' जुगाड पडू शकतो महागात!
15
"दहशतवादाला ना धर्म असतो, ना कोणता देश"; राजनाथ सिंहांनी पाकिस्तानला क्लिन चिट दिली? काँग्रेस आक्रमक
16
विराटच्या खांद्याला खांदा लावून वर्ल्डकप जिंकला, आता IPL 2026 मध्ये करतोय पंचगिरी, कोण आहे 'हा' खेळाडू?
17
३३ व्या वाढदिवसाचा भयंकर स्टंट! गोरेगावमध्ये पेट्रोल ओतून रस्ता पेटवला; रील स्टारला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
19
"संजय राऊत, अशी मुक्ताफळं उधळताना तुम्हाला लाज वाटली नाही का..?"; भाजप नेत्याचा खरमरीत सवाल
20
नवरदेव झिंगत डुलत आला, कारमधून उतरताना लटपटला, संतप्त वधूने तिथेच लग्न मोडले
Daily Top 2Weekly Top 5

पावसाळी कामांचा ४ दिवसांत अहवाल द्या

By admin | Updated: June 23, 2015 03:27 IST

मॉन्सूनच्या आगमनानंतर झालेल्या पहिल्याच पावसाने शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले, रस्त्यांवर मोठे खड्डे पडले यावरून महापालिकेच्या मुख्य सभेत सभासदांनी

पुणे : मॉन्सूनच्या आगमनानंतर झालेल्या पहिल्याच पावसाने शहरात अनेक ठिकाणी पाणी साचले, रस्त्यांवर मोठे खड्डे पडले यावरून महापालिकेच्या मुख्य सभेत सभासदांनी प्रशासनाला धारेवर धरले. सभासदांनी केलेल्या तक्रारींची पाहणी करून त्याबाबतचा अहवाल ४ दिवसांमध्ये सादर करावा, असे आदेश महापौर दत्तात्रय धनकवडे यांनी सोमवारी दिले.मुख्य सभेच्या कामकाजाला सुरुवात होताच पहिल्या पावसाने शहरामध्ये झालेल्या दुरवस्थेच्या अडचणी मांडण्यास सभासदांनी सुरुवात केली. पहिल्याच पावसाने जर शहराची ही परिस्थिती होत असेल, तर आणखी ३ महिन्यांत काय दुरवस्था होईल, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गणेश बिडकर म्हणाले, ‘‘शहरात पहिल्या पावसाने अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. सिमेंटच्या रस्त्यांची कामे अर्धवट राहिली आहेत. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.’’ ताराचंद हॉस्पिटल येथे नुकताच तयार करण्यात आलेल्या रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असल्याचे रवींद्र माळवदकर यांनी स्पष्ट केले. स. प. महाविद्यालयाजवळ गुडघ्याएवढे पाणी साचत असल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे मनीषा घाटे यांनी सांगितले. पावसाळी गटारांमधून व्यवस्थित गाळ काढण्यात आलेला नसल्याचे संजय भोसले यांनी स्पष्ट केले. पावसाळी पूर्वतयारीची कामे अशाच पद्धतीने सुरू राहिल्यास पुण्याची मुंबईसारखी स्थिती होण्यास वेळ लागणार नाही, असे दीपक मानकर यांनी स्पष्ट केले. दर वर्षी पाणी साचणारी ठिकाणे निश्चित करून त्याकडे प्रशासनाने लक्ष देणे आवश्यक असल्याचे सभागृहनेते बंडू केमसे यांनी सांगितले. प्रशासनाने काहीच कामे केली नाहीत, असे म्हणता येणार नाही. राहिलेली कामे येत्या ८ दिवसांमध्ये पूर्ण केली जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.मुख्य अभियंता विवेक खरवडकर यांनी सांगितले, ‘‘गावठाण परिसरातील ड्रेनेजलाईनच्या दुरुस्तीचे मोठे काम प्रशासनाने पार पाडले आहे. सिमेंटच्या रस्त्यांची कामे थांबविली जाणार नाहीत. सभासदांनी ज्या ठिकाणच्या तक्रारी केल्या आहेत, त्यांची पाहणी करून आवश्यक त्या सुधारणा केल्या जातील.’’