शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

परीक्षेच्या तक्रारी नोंदवा ४८ तासांच्या आत; विद्यापीठाकडून नियमावली प्रसिद्ध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 22:09 IST

प्रत्येक विद्यार्थ्याला परीक्षेचा एसएमएस

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे येत्या १० एप्रिलपासून घेतल्या जाणाऱ्या प्रथम ते अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांसाठी मार्गदर्शक सूचना विद्यापीठातर्फे प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. परीक्षा झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांना संबंधित विषयात मिळालेले गुण हे  ४८ तासाच्या आत स्टुडन्ट प्रोफाइल सिस्टीम मध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहेत. त्यानंतर पुढील 48 तासात विद्यार्थ्यांच्या अडचणी व शंका आणि तक्रारी त्याच ठिकाणी नोंदवता येणार आहेत.स्टुडन्ट प्रोफाइल सिस्टीममध्ये नोंदविलेल्या तक्रारींची शिवाय इतर कोणत्याही तक्रारी स्वीकारल्या जाणार नाहीत, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

विद्यापीठातर्फे येत्या ५ ते ९ एप्रिलपर्यंत सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत मॉक टेस्ट देता येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचा सराव करणे शक्य होणार आहे.ऑनलाइन परीक्षेत काही तांत्रिक कारणाने खंड पडल्यास तेवढाच कालावधी संबंधित विद्यार्थ्याला संगणकीय प्रणालीतून वाढून दिला जाणार आहे. तसेच यापूर्वी सोडलेली उत्तरे सेव होऊन खंड पडलेल्या कालावधीपासून पुढे परीक्षा सुरू होईल.

परीक्षेसाठी प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्याला परीक्षेसंदर्भातील माहिती एसएमएस व ईमेल द्वारे अवगत केली जाणार आहे मात्र त्यासाठी विद्यार्थ्याचा नोंदणीकृत ई-मेल आयडी व मोबाईल क्रमांक कार्यान्वित असणे आवश्यक आहे. दिव्यांग विद्यार्थ्यांना शासन निर्णय नुसार परीक्षेसाठी २० मिनिटांचा कालावधी अधिक दिला जाणार आहे. विद्यापीठाने यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकानुसार अभियांत्रिकी २०१५ पॅटर्न च्या प्रथम वर्षाच्या प्रथम सत्रातील अनुशेष (बॅकलॉग) विद्यार्थ्यांच्या परीक्षा शंभर टक्के अभ्यासक्रमावर असतील.  गणित व संख्याशास्त्र अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन प्रॉक्टर पद्धतीने बहुपर्यायी पद्धतीने ५० गुणांकरिता ३० प्रश्न प्रत्येक २ गुणांसाठी या पद्धतीने विचारण्यात येतील विद्यार्थ्यांनी दिलेली २५ प्रश्नांची अचूक उत्तरे ग्राह्य धरण्यात येतील, असे विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.-----------------परीक्षा देणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याने ऑनलाईन परीक्षा पूर्ण केल्याची पोहोच दिसेल अशा पद्धतीने स्क्रीन शॉट ,फोटो ,प्रिंट जतन करून ठेवावे. विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी केवळ sppuexam.in या संकेतस्थळाचा वापर करावा. याच संकेतस्थळावर परीक्षेसंदर्भातील आवश्यक माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच परीक्षेचे दरम्यान काही अडचण आल्यास ०२०- ७१५३०२०२ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे--------

टॅग्स :Puneपुणेexamपरीक्षाStudentविद्यार्थीPune universityपुणे विद्यापीठ