शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री करण्याला फडणवीस,अजित पवारांचा विरोध होता"
2
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
3
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
4
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
5
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
6
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
7
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
8
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
9
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
10
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
11
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
12
'सिंघम 3' च्या सेटवरुन अजय देवगण-जॅकी श्रॉफचा फाईट सीन लीक, व्हिडीओ व्हायरल
13
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
14
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
15
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
16
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
17
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
18
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
19
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
20
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 

पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील यांची बदली

By admin | Published: July 05, 2016 9:37 PM

चार वर्षांपासून पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून काम पाहत असलेले सुहास पाटील याची अखेर बदली झाली आहे. त्यांची जागा नागपूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. ५ : चार वर्षांपासून पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणून काम पाहत असलेले सुहास पाटील याची अखेर बदली झाली आहे. त्यांची जागा नागपूरचे जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान घेणार असल्याचे विश्वसनीय सुत्रांनी ‘लोकमत’ला सांगितले. एक चांगला अधिकारी म्हणून संतान यांनी नागपूर विभागात आपली प्रतिमा तयार केली आहे. कामाशी प्रामाणिक असणाऱ्या स्वच्छ प्रतिमेच्या अधिकाऱ्याकडे पुण्यासारख्या महत्वाच्या जिल्हाचा कारभार असावा, म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतान यांचे नाव फायनल केले, अशी चर्चा आहे.सध्या नागपुरात असलेल्या ४९ वर्षीय संतान यांनी ३ वर्षे नागपूरचे प्रभारी उपसंचालकपद सांभाळले. याआधी यवतमाळ, अमरावती, चंद्रपूर जिल्ह्यांचे क्रीडा अधिकारी म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. ४६ वर्षीय सुहास पाटील हे मागील ४ वर्षांपासून पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी होते. त्याआधी ३ वर्षे ते सहायक संचालक होते. या ७ वर्षांच्या काळात त्यांच्याकडे क्रीडा प्रबोधिनीचे प्राचार्यपदही होते. क्रीडा विभागातील उपसंचालक जनक टेकाळे सेवानिवृत्त झाल्यानंतर पाटील यांच्याकडे मागील आठवड्यात पुणे विभागाचे प्रभारी उपसंचालक म्हणून अतिरिक्त जबाबदारीदेखील देण्यात आली आहे. ३ दिवसांपूर्वी त्यांनी सातारा जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी म्हणून सुत्रे स्वीकारली. पूर्वी साताऱ्याला असलेले अहमदनगर जिल्ह्याचे क्रीडा अधिकारी म्हणून उदय जोशी यांची बदली झाल्याचे कळते. काही बदल्यांसदर्भातील अधिकृत अध्यादेश अद्याप निघालेला नव्हता.अशा झाल्या बदल्या...जिल्हा क्रीडा अधिकारी (नाव, आधी व आताचा जिल्हा या क्रमानुसार) : सुहास पाटील (पुणे-सातारा), विजय संतान (नागपूर-पुणे), उदय जोशी (सातारा-अहमदनगर), अनिल चोरमले (अहमदनगर-सांगली), अविनाश पुंड (अमरावती-नागपूर), गणेश जाधव (बुलडाणा-अमरावती), अशोक गिरी (गोंदिया-बुलडाणा).उपसंचालक (नाव, आधी व आताचा जिल्हा या क्रमानुसार) : आनंद व्यंकेश्वर (मुंबई-पुणे मुख्यालय), ना. गा. मोटे (पुणे मुख्यालय-मुंबई), प्रतिभा देशमुख (लातूर-अमरावती), जयप्रकाश दुबळे (अमरावती-नाशिक). (क्रीडा प्रतिनिधी)