शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

अखेर बीअारटी बसस्टाॅपच्या दरवाजांचे दुरुस्तीचे काम सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2018 16:02 IST

बीअारटी मार्गातील बसस्टाॅपचे उघडे राहणारे दरवाजे दुरुस्त करण्याचे काम पीएमपीकडून हाती घेण्यात अाले अाहे. त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित प्रवास करता येणार अाहे.

ठळक मुद्देदरवाजे उघडे राहत असल्याने प्रवाशांच्या जीवाला हाेता धाेकादुरुस्तीचे काम करण्यात येणार युद्धपातळीवर

पुणे : बीअारटी मार्गातील बसस्टाॅपचे उघडे राहणारे दरवाजे दुरुस्त करण्याचे काम पीएमपीकडून युद्ध पातळीवर करण्यात येत असून लवकरच संगमवाडी ते विश्रांतवाडी अाणि नगरराेड बीअारटी मार्गावरील बसस्टाॅपचे नादुरुस्त दरवाजे दुरुस्त हाेणार अाहेत. त्यामुळे प्रवाशांच्या जीवाला निर्माण झालेला धाेका टळणार असून त्यांना सुरक्षित प्रवास करता येणार अाहे.     बीअारटी बसस्टाॅपचे दरवाजे उघडेच; प्रवाशांचा जीव धाेक्यात या शिर्षकाने लाेकमतने याबाबतचे वृत्त काही दिवसांपूर्वी प्रकाशित केले हाेते. तेव्हा पीएमपीचे सहव्यवस्थापक अजय चारठणकर यांनी काही तांत्रिक कारणांमुळे दुरुस्तीचे काम झाले नसल्याचे सांगितले हाेते. तसेच लवकरच हे काम हाती घेणार असल्याचे अाश्वासनही त्यांनी दिले हाेते. त्यानुसार दुरुस्तीचे काम अाता हाती घेण्यात अाले असून त्याचा अाढावाही घेण्यात येणार अाहे. संगमवाडी ते विश्रांतवाडी अाणि नगरराेड बीअारटी मार्गातील अनेक बसस्टाॅप्सचे काचेचे दरवाजे हे उघडेच ठेवले जायचे. बस ही बसस्टाॅपमध्ये अाल्यानंतर हे दरवाजे उघडणे अपेक्षित अाहे. तसे सेन्साॅरही तेथे लावण्यात अाले अाहेत. परंतु काही तांत्रिक कारणांमुळे हे दरवाजे बंद पडले हाेते. त्यामुळे ते उघडेच ठेवले जात हाेते. बस अाल्यानंतर प्रवासी कुठली बस अाहे हे पाहण्यासाठी दरवाज्यांच्या बाहेर येत वाकून बघत असल्याने त्यांच्या जीवाला धाेका निर्माण झाला हाेता. तसेच सकाळच्या अाणि संध्याकाळच्यावेळी येथे गर्दी असल्याने बस अाल्यानंतर एखाद्याचा धक्का लागून अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली हाेती. त्यामुळे पीएमपीने याबाबतची दखल घेतली असून हे दरवाजे व इतर तांत्रिक अडचणी दूर करण्याचे काम हाती घेतले अाहे.     चारठणकर म्हणाले, सध्या संगमवाडी ते विश्रांतवाडी अाणि नगरराेड बीअारटी मार्गाच्या बस थांब्यांचे काम हाती घेण्यात अाले अाहे. येत्या काही दिवसांमध्ये या दाेन्ही मार्गावरील दरवाजे दुरुस्त करण्यात येणार अाहेत. सध्या हे काम युद्धपातळीवर सुरु अाहे. नगरराेडच्या बीअारटी मार्गाचा अाम्ही 15 मेला अाढावा घेणार अाहाेत. या मार्गांवरील त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न पीएमपी प्रशासन करत अाहे.  

टॅग्स :PuneपुणेPune BRTपुणे बीआरटीPMPMLपीएमपीएमएलVishrantwadiविश्रांतवाडी