पिंपळाचीवाडी बंधाऱ्याच्या दुरुस्तीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:48+5:302021-06-09T04:13:48+5:30
---------- गणेश कदम : जिल्हा परिषदेतून साडेतास लाखांचा निधी मंजूर -- खोर : अनेक दिवसांपासूनच्या प्रतीक्षेत असलेल्या खोर (ता. ...

पिंपळाचीवाडी बंधाऱ्याच्या दुरुस्तीला सुरुवात
----------
गणेश कदम : जिल्हा परिषदेतून साडेतास लाखांचा निधी मंजूर
--
खोर : अनेक दिवसांपासूनच्या प्रतीक्षेत असलेल्या खोर (ता. दौंड) येथील पिंपळाचीवाडी येथील बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या वर्षी खोरच्या परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने या भागातील बंधारे तुडुंब भरून वाहू लागले. जास्तीच्या पाण्याच्या पातळीने बंधारा फुटला गेला आणि शेतकरी वर्गाच्या शेतजमिनीमध्ये पाणी घुसले गेले. परिणामी मागील झालेल्या पावसात शेतकरी वर्गाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याबाबत ‘लोकमत’ने बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या संदर्भात वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत तातडीने कामाला सुरवात केली.
बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल चौधरी व विकास चौधरी यांनी जिल्हा परिषद व दौंड पंचायत समितीकडे केली होती. त्यानुसार दौंड पंचायत समितीचे सदस्य नितीन दोरगे यांच्या पाठपुराव्यातून व जिल्हा परिषदेचे सदस्य गणेश कदम यांच्या जिल्हा परिषदेच्या १५व्या वित्त आयोग निधीतून जवळपास ७ लाख ५० हजार रुपये बंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामासाठी देण्यात आला आहे. या कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम व पंचायत समितीचे सदस्य नितीन दोरगे यांच्या उपस्थितीत पार पडले. या बंधाऱ्यावर जवळपास या भागातील १५० हेक्टर ओलिताखाली येणार असून या बंधाऱ्याच्या कामाच्या माध्यमातून मोठा फायदा या भागातील शेतकरी वर्गाला होणार आहे.
बंधारा दुरुस्की कामाला सुरवात केली त्यावेळी जिल्हा परिषद सदस्य गणेश कदम, पंचायत समितीचे सदस्य नितीन दोरगे, उपसरपंच पोपट चौधरी, माजी सरपंच सुभाष चौधरी, भगवानराव चौधरी, विठ्ठल चौधरी, विकास चौधरी, राहुल चौधरी, सर्जेराव चौधरी, सागर चौधरी, मारुती चौधरी, बाळासाहेब चौधरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
--
हाक तुमची... विकासकामे आमची...! खोर हा भाग दुष्काळी ओळख पुसून हरित क्रांतीच्या दिशेने वाटचाल करीत असून या भागातील बंधारा दुरुस्ती असेल, नवीन बंधारा तयार करणे, ओढे खोलीकरण या सगळ्या कामांच्यासाठी आम्ही कटिबद्ध असून स्थानिक ग्रामस्थांनी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. हाक तुमची... आणि काम आमचे या हेतूने जनतेच्या सेवेसाठी कायमस्वरूपी कटिबद्ध राहणार आहे.
- नितीन दोरगे (सदस्य, पंचायत समिती दौंड)
--
फोटो क्रमांक : ०८खोर पिंपळाचीवाडी बंधारा दुरुस्ती
फोटोओळ : खोर (ता. दौंड) येथील पिंपळाचीवाडी येथील बंधारा दुरुस्तीवेळी उपस्थित पदाधिकारी व ग्रामस्थ.
फोटो २- लोकमत इम्पॅक्ट न्यू
===Photopath===
080621\08pun_5_08062021_6.jpg~080621\08pun_6_08062021_6.jpg
===Caption===
फोटो क्रमांक : ०८खोर पिंपळाचीवाडी बंधारा दुरुस्ती फोटोओळ : खोर (ता.दौंड) येथील पिंपळाचीवाडी येथील बंधारा दुरुस्तीवेळी उपस्थित पदाधिकारी व ग्रामस्थ ~लोकमतमध्ये प्रकाशित झालेली बातमी