आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे भाडे थकले
By Admin | Updated: June 9, 2014 04:46 IST2014-06-09T04:46:16+5:302014-06-09T04:46:16+5:30
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव (ता. आंबेगाव) अंतर्गत काटेपुरम चौक, पिंंपळे गुरव येथे शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह सुरू आहे

आदिवासी मुलींच्या वसतिगृहाचे भाडे थकले
पिंंपळे गुरव : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव (ता. आंबेगाव) अंतर्गत काटेपुरम चौक, पिंंपळे गुरव येथे शासकीय आदिवासी मुलींचे वसतिगृह सुरूआहे. या वसतिगृहाची इमारत भाड्याने असून, २२ महिन्यांपासून भाडे रखडले आहे. वर्षभरापासून मागणी करूनही भाडे न मिळाल्याने इमारतीच्या मालकाने इमारत मोकळी करण्याची नोटीस दिली आहे.
जागामालक बळीराम आनंदराव घोडके यांनी गांगर्डेनगर, प्रज्वल हाइट्स येथील ७४९.५५ चौरस मीटर जागा आदिवासी मुलींच्या वसतिगृहासाठी ८० हजार ६०७ रुपये भाड्याने तीन वर्षांच्या कराराने दिली आहे. या वसतिगृहामध्ये पुणे, नगर, नाशिक जिल्ह्यातील आदिवासी भागातील १२५ मुलींचे वास्तव्य आहे. सन २०१२ पर्यंतचे घोडके यांना पूर्णत: भाडे मिळाले. मात्र २०१२ ते २०१५ या तीन वर्षांच्या नवीन करारानुसार १७ लाख ७३ हजार ३५४ रुपये भाडे रखडले आहे. ठाणे विभागाचे अप्पर आयुक्त सुधीर पाटील,
आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड, राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्यासह पत्रव्यवहार क रून भाडे मिळण्याची विनंती केली. मात्र, अद्याप कोणत्याही प्रकारची कार्यवाही करण्यात आली नाही. याबाबत जागामालक घोडके अप्पर आयुक्त सुधीर पाटील यांना भेटण्यास आठ वेळा गेले. मात्र ५ वेळा भेट नाकारली. ११ मार्चच्या भेटीमध्ये धमकी देऊन तुम्हाला भाडे मिळू देणार नाही; न्यायालयात जा, आयुक्तांकडे जा, आदिवासी मंत्र्याकडे जा, वसतिगृह खाली करण्यासाठी नोटीस दे, उलट मी तुझ्यावर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करतो, असे धमकाविले.